माङो डोळे सारखे चुरचुरतात, आणि लाल होतात. आई म्हणजे जास्त मोबाईल बघतोस ना म्हणून होतं. हे खरं आहे का? या दोन्हीचा जवळचा संबंध आहे का? अविनाश मालपेकर, ठाणो
- अविनाश, आपले डोळे आणि मोबाईलचा स्क्रीन यांचा खूप जवळचा संबंध आहे. सतत मोबाईलच्या स्क्रीनकडे बघितल्यामुळे आपले डोळे थकतात. तसंच मोबाईलमधून येणारा जो लाईट असतो तोही सतत आपल्या डोळ्यांवर पडल्यामुळेही आपल्या डोळ्यांना त्रस होण्याची शक्यता असते. सतत मोबाईल किंवा कुठलाही स्क्रीन बघितल्यामुळे डोळे उघड बंद करण्याची आपली नैसर्गिक प्रक्रिया मंदावते. आणि त्यामुळे आपली अश्रू पटले कोरडी होतात. त्यामुळे डोळे चुरचुरणो, डोळ्यांना आग आग होणो, डोळे थकणो असा त्रस सुरू होतो. त्यामुळे आई म्हणतेय ते बरोबरच आहे. या दोन्हीचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे. सतत मोबाईल बघितल्यामुळेच हे असं होतंय!पण मग यावर उपाय आहे का?
तर हो, अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. 1) दर अध्र्या तासाने स्क्रीन ब्रेक घे. म्हणजे दर 30 मिनिटांनी 10/15 मिनिटांसाठी स्क्रीन बंद कर. 2) दिवसभर किती वेळ स्क्रीन टाइम असेल ते ठरव. 3) स्क्रीन टाइम मध्ये टीव्ही, मोबाईल, टॅब, लॅपटॉप सगळं आलं बरका. हा वेळ 1 ते 2 तासांपेक्षा जास्त नको. 4) मोबाईलकडे बघताना लक्षात ठेऊन डोळ्यांची उघडझाप कर. 5) अधून मधून थंड पाण्याने डोळे धू. आणि गरज वाटली तर गुलाब पाण्याच्या किंवा साध्या पाण्याच्या घड्या थोडावेळ डोळ्यांवर ठेव.