तुम्हाला को-या कागदावर रेघोटय़ा मारायला आवडतात? किती मज्जा येते ना, कोरे कागद, पांढ-या भिंती.. नकोनको भिंतींवर नको नाहीतर आईबाबा रागावतील. मोठय़ा माणसांना भिंतींवर रेघोटय़ा मारायची गंमत कध्धी कळतच नाही. त्यांना वाटतं तुम्ही मुलं भिंतीघाण करता; पण कधी तरी ना त्यांच्या हातात रंग देऊन त्यांना भिंतींवर चित्र काढायला सांगितलं पाहिजे म्हणजे त्यातली गम्मत कळेल.बरं ते जाऊ द्या. तर आजपण डुडल आर्ट करूया.साहित्य :कोरा पांढरा किंवा तुमच्या आवडीच्या रंगाचा कागद,पेन्सिल, रंग, ब्रश
कृती :1. तुम्ही निवडलेल्या कागदावर पेन्सिलीने पाहिजे तशारेघोटय़ा, गोलगोल आकार, त्रिकोण, चौकोन काढा.2. काढताना सगळं एकात एक गुंतू देत.3. मग हे सगळं वेटोळं करून झालं की त्यात असंख्य लहान-मोठे आकार तयार होतील.4. त्या आकारांमध्ये छान छान आवडीचे रंग भरा.5. कुठल्या रंगाशेजारी कुठला रंग भरा, असं काहीहीसांगणार नाही.6. तुम्हाला पाहिजे ते रंग, तुमच्या मर्जीने भरून टाका.7. आणि बघा मस्त डिझाइनचं तुमचं डुडल तयार होईल.8. मग त्यातल्या एक-दोन आकारांना नाक डोळे काढूनमस्त पैकी लूक द्या.