घरात काम करता आहात कि नाही? आईबाबांना घरकामात, स्वयंपाकात मदत करताय ना? आईला सारखा स्वयंपाक करून करून कंटाळा आला असेल. तिलाही हवीच ना थोडी विश्रंती. मग एक काम करा, घरात जर ब्रेड असेल तर मस्त सॅन्डविच बनवा आणि आईला द्या. साहित्य : काकडी, कांदा, गाजर, टोमॅटो सगळं गोल चिरून, टोमॅटो सॉस, बटर, घरात असेल तर पिझा पास्ता सॉस, ब्रेड कृती : 1. ब्रेडच्या तीन स्लाइस घ्या. 2. एकाला बटर लावा. दुस?्याला सॉस लावा. आणि तिस?्याला पिझा पास्ता सॉस लावा. 3. बटर वाली स्लाइस आपल्याला मध्ये ठेवायची आहे. 4. सगळ्यात खाली पिझा पास्ता वाली स्लाइस ठेवा. 5. त्यावर कांदा आणि टोमॅटोच्या गोल स्लाइस ठेवा. 6. त्यावर बटर लावलेली ब्रेडची स्लाइस ठेवा. 7. बटरची बाजू वर यायला हवी. 8. आता त्यावर काकड्या आणि गाजर पसरा. 9. त्यानंतरच्या सॉसवाली स्लाइस ठेवा. सॉस खालच्या बाजूने येईल अशी ठेवा.
10. सगळं व्यवस्थित दाबून घ्या, म्हणजे सुटणार नाही. 11. सॅन्डविच बरोबर मध्ये कापून दोन तुकडे करा. 12. आईबाबांना आवडत असेल तर वरून चीज किसून घाला. . तुमचं रंगीत सॅन्डविच तय्यार.