साहित्य: पांढरा कोरा कागद, रंग, पेन्सिल, अंगणातल्या झाडाच्या दोन छोटी फांद्या, कात्री, दोरा. कृती 1) कागदावर सूर्य, ढग, इंद्रधनुष्याचा आकार, पक्षी, चंद्र, तारे असं सगळं काढून घ्या. 2) कात्रीने सगळे आकार कापा. गरज वाटली तर यासाठी मोठ्यांची मदत घ्या. 3) आता प्रत्येक आकार मस्त रंगवा. 4) इंद्रधनुष्यासाठी तां ना, पि, हि, नि, पा, जा लक्षात ठेवा. म्हणजे, तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा, जांभळा हे रंग याच क्रमाने लावा. 5) आता झाडाची एक फांदी घ्या. त्याचा करूया दिवस.6) प्रत्येक आकाराला वरच्या बाजूने छोटंसं भोक पडून त्यात दोरा ओवा. 7) दिवसाचे सगळे आकार, म्हणजे सूर्य, ढग, इंद्रधनुष्य, पक्षी फांदीच्या एका एका काडीला कमीजास्त उंचीवर लटकवा. व्यवस्थित बांधून टाका.
8) आता रात्र बनवूया. त्यासाठी चंद्र, तारे घ्या. 9) दिवस जसा फांदीला लटकावला तशीच रात्रही लटकवा. 10) आणि दिवस रात्र तुमच्या खोलीत, बैठकीच्या खोलीत किंवा तुम्हाला आवडेल तिथे घरात उंचावर लावा. वारा आला कि सगळे आकार मस्त हालतील, तेव्हा त्यांची गंमत पहा.