मला माहितीये, तुम्ही रोज व्यायाम करताहात, एकही दिवस तुम्ही व्यायामाला दांडी मारत नाहीत. पण एक लक्षात ठेवा, अति तिथे माती. एकाच दिवशी खूप आणि तोच तोच व्ययाम रोज करायचा नाही. थोडा आलटून पालटून करायचा. त्यामुळेच तर मी रोज तुम्हाला वेगवेगळे व्यायाम शिकवतेय. या प्रत्येक व्यायामाच वेगवेगळा उपयोग आहे. कुठल्या व्यायामानं तुमची ताकद वाढेल, काही व्यायामानं तुमची लवचिकता वाढेल, तर काही व्यायामानं तुमचा स्टॅमिना वाढेल.आज आपण करू या नमस्काराचा व्यायाम.काय म्हणता? झालाय हा व्यायाम? कालच झालाय? पण आज मी जो व्यायाम तुम्हाला सांगणार आहे, त्याचा अर्थ नमस्कारच असला तरी कालच्यापेक्षा हा नमस्कार वेगळा आहे. काल तुम्ही आई-वडिलांना नमस्कार केला होता, आज स्वत:लाच नमस्कार करायचा आहे. काय करायचं?1. खाली ‘ढू’ वर बसा. पाठ ताठ. आता तुमचे दोन्ही पाय तुमच्या दोन्ह्ी बाजूला जेवढे फाकवता येतील तेवढे फाकवा. पण सहजपणो जमतील तेवढेच. उगाच ताणाताणी करायची नाही आणि आपले गुडघेही उचलायचे नाहीत. 2. आता आपल्या डाव्या पायाच्या बोटांना उजव्या हाताची बोटं टेकवायचा प्रय} करा. 3. काय? काहींना जमतंय आणि काहींना नाही जमत? गुडघा आपोआप वर उचलला जातोय?4. मग एक आयडिया आहे. आपल्या डाव्या हातानं डाव्या पायाची मुंडी; म्हणजे गुडघा खाली दाबून ठेवा. आता आपला उजवा हात डाव्या पायाच्या बोटांना लावायचा प्रय} करा. बघा, जमलं ना? 5. असंच आता उजव्या पायाची मुंडी उजव्याच हातानं दाबून धरा आणि डाव्या हाताची बोटं उजव्या पायाला लावायचा प्रय} करा. असं पाच-पाच वेळा करा. सुरुवातीला थोडं जड जाईल, पण नंतर एकदम इझी वाटेल. आणि नसेल जमत एकदम भारी, तरी नो टेन्शन. लागली बेट. तुमच्या आई-बाबांना तर तुमच्याइतकंही येत नसणार! सो, डरनेका नहीं. या व्यायामामुळे तुमच्या सांध्यांची मुव्हमेंट चांगली होईल. तुमचं ब्लड सक्यरुलेशन वाढेल. तुमचे मसल्स रिलॅक्स होतील आणि तुम्हाला एकदम भारी वाटेल.- तुमची ‘मुंडीदाबू’ मैत्रीण ऊर्जा
स्वत:लाच नमस्कार, असा करा हा भन्नाट व्यायाम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 11:22 PM
काल तुम्ही आई-वडिलांना नमस्कार केला होता, आज स्वत:लाच नमस्कार करायचा आहे.
ठळक मुद्देमाझा नमस्कार, मलाच!