-आनंद निकेतन शाळा , नाशिक
इंग्रजी म्हणजे मोठा शत्रूच जसा काय तुमचा! त्याच्याशी मैत्री होतेच आहे ना हळूहळू! आता आजची गंमत पाहा. खाली एकूण चौदा इंग्रजी शब्दांच्या स्पेलिंग्जची भेळ दिलेली आहे. म्हणजे काय? तर एका शब्दातली अक्षरं उलट्यापालट्या क्रमाने लिहिली आहेत.तुम्ही काय करायचं?1. ही आहेत इंग्रजी आकड्यांची स्पेलिंग्ज. त्यात काही नुसते आकडे आहेत. म्हणजे one, two, three, असे. तर काही त्या आकड्यांची रुपं आहेत म्हणजे first, second, third अशी3. ते शब्द ओळखायचे आणि त्यांची स्पेलिंग्ज नीट लिहायची.4. बघा करून, तुमचा अर्धा तास तरी मस्त जाणार नक्की!
1. v e n s e______________ 2. t h i g e ______________3. h e r e t______________ 4. v l e e w t ______________5. t e x n i s e ______________ 6. t n i h n ______________7. e f f i h i t t ______________8. d o s e n c ______________9. d u r e n h d ______________ 10. t y o r f ______________11. e n e t e n n i______________ 12. e h i h t t t i r ______________13. l e e n t v e h______________ 14. t h i g e e t h i _____________15. s h o a n d u t______________