शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
2
"देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा", सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री चंद्राबाबूंना झापले 
3
शिंदे गटातील आमदाराविरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा; हजारोंची गर्दी, काय आहे प्रकरण?
4
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
5
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...
6
प्रसिद्ध अभिनेता झाला शेतकरी, घेतलं १.५ कोटींचं कर्ज; मुलाच्या शाळेबाहेर विकावी लागली भाजी
7
टेस्टमध्ये टी-२० तडका! रोहित-यशस्वी जोडीनं सेट केला 'फास्टर फिफ्टी'चा रेकॉर्ड
8
अमेरिकेचा सीरियावर 'एअरस्ट्राइक'! हल्ल्यात ISIS, अल कायदाच्या ३७ दहशतवाद्यांचा खात्मा
9
संतापजनक! वडिलांची हत्या करून मुलांनी घरातच पुरला मृतदेह; ३० वर्षांनी उघड झालं रहस्य
10
कधीकाळी 75-80 टक्के ख्रिश्चन लोकसंख्या असलेला लेबनॉन मुस्लिम देश कसा बनला? वाचा...
11
'खटाखट'नंतर आता 'धडाधड'ची एन्ट्री...; अंबालातून राहुल-प्रियांका यांचा हल्लाबोल, भाजपवर थेट निशाना
12
१२ दिवसांत हिजबुल्लाहचा गेम फिनिश..पेजर हल्ला ते बंकर स्फोटापर्यंत इस्त्रायलचा तांडव
13
ठरलं! मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणार; म्हणाले, “१२ वाजता या, एकजूट अन् शक्ती दाखवा”
14
विधानसभेआधी धारावीकरांसाठी सरकारची मोठी भेट; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ३८ निर्णय
15
३०० विकेट्स अन् ३००० धावांच्या कॉम्बोसह जड्डूच्या नावे झाला जम्बो रेकॉर्ड
16
सीबीआयचे पुण्यासह देशात ३२ ठिकाणी छापे; तीन शहरातील २६ म्होरक्यांना अटक
17
फायद्याची गोष्ट! आधार कार्ड करता येऊ शकतं लॉक; जाणून घ्या, कसं काम करतं हे भन्नाट फीचर
18
भाजपाची बंडखोरांवर कारवाई! माजी मंत्र्यासह 'या' नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
19
बारामतीच्या महाविद्यालयात विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करत खून, दुचाकीला कट मारल्याचा 'बदला'
20
सलग २४ व्या दिवशी अपर सर्किट, ₹३३ चा 'हा' शेअर ₹२६०० पार; कोणी शेअर विकणारंच नाही

एक दिन का अर्थमंत्री बनने का क्या ? घ्या सूत्र हातात आणि घराचं बजेट तयार करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 9:05 AM

दर महिन्याला किती पैसे लागतात? करा बरं अंदाज, की घर चालवायला आईबाबांना एकूण किती खर्च येत असेल?

ठळक मुद्देआपल्याला पाहिजे असलेली वस्तू बजेटमध्ये बसू शकते का आणि ती घेणं इतकं महत्वाचं का हे तुमचं तुम्हीसुद्धा ठरवू शकाल!

- गौरी पटवर्धन

 किती वेळा तुम्ही एखादी गोष्ट मागितली आणि आईवडिलांनी दिली नाही? किंवा तुम्ही एक वस्तू मागितली तर त्यांनी त्याऐवजी भलतंच काहीतरी दिलं? आठवा बरं, खूप वेळा झालं असेल ना? आणि तरीही तुम्ही हट्ट केल्यावर त्यांचा सगळ्यात आवडता डायलॉग कुठला?  ‘पैसे काय झाडाला लागतात का?’’  ‘अक्कल नाही एक रुपया कमावण्याची आणि चालले शायनिंग मारायला!’’आणि मग तुम्हाला काय वाटलं असेल सांगू? .. फक्त मला काहीतरी हवं असेल की बजेट नसतं. बाकी सगळ्यांना पाहिजे ते घेऊन देतात! मग हा तिढा सोडवायचा कसा? तर त्यावर इलाज एकच! आपण आईवडिलांना महिन्याचा घरखर्च लिहायला मदत करायची.

आधी आपण घरात दर महिन्याला काय काय खर्च असतो त्याची यादी करायची. काय काय येईल त्या यादीत? दूध, किराणा, भाजी, फळं, विजेचं बिल, बचत.. तुम्ही करा विचार. असे किती आयटम तुम्हाला सापडतात? फुलस्केप पेपरवर याची यादी करा. त्यापुढे दोन कॉलम आखा. पहिल्या कॉलममध्ये तुमच्या मते या गोष्टीसाठी अंदाजे किती खर्च होत असेल तो आकडा लिहा. तुमचा कॉलम पूर्ण भरला की मग आई आणि वडिलांना विचारून त्या त्या गोष्टीसाठी खरंच किती खर्च होतो ते दुस?्या कॉलममध्ये लिहा. ते लिहून झालं की ते दोघं तुम्हाला अजिबात न सुचलेले खर्च सांगतील. ते पण त्याच्यात वाढवा. त्याचेही आकडे लिहा.आता आईबाबांनी आकडे सांगितलेल्या कॉलमची बेरीज करा. दर महिन्याला आपलं घर चालवण्यासाठी किती पैसे लागतात ते तुमच्या लक्षात येईल. आणि मग आपल्याला पाहिजे असलेली वस्तू बजेटमध्ये बसू शकते का आणि ती घेणं इतकं महत्वाचं का हे तुमचं तुम्हीसुद्धा ठरवू शकाल!