शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा फॉर्म्युला; सहा आमदारांमागे एक मंत्रिपद; विस्तारासाठी फडणवीस, अजित पवार दिल्लीत
2
आजचे राशीभविष्य - १२ डिसेंबर २०२४: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
3
अंबादास दानवेंचे विरोधीपक्षनेते पद धोक्यात; संख्याबळ समान झाल्याने काँग्रेसला हवे झाले...
4
परभणी बंदला हिंसक वळण; जमावबंदी लागू; तणाव कायम
5
सातपुड्यात दवांचा बर्फ; तापमान आले ६ अंशांवर; काश्मीरसारख्या थंडीचा अनुभव
6
जामिनासाठी न्यायाधीशाने मागितले पाच लाख; चौघांवर गुन्हा दाखल
7
गुलाब घेऊन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांचे स्वागत; राहुल गांधींनी राजनाथ सिंह यांना दिला तिरंगा
8
‘इंडिया’चा हायकोर्टाच्या न्यायाधीशांविरोधात महाभियोग
9
तलाठी बनविताे : क्लास वन अधिकाऱ्याने 16 जणांना गंडविले
10
भारताने माघार घेतल्यास ५,७२० कोटी रुपयांचे नुकसान; पाकने घेतल्यास केवळ ६३५ कोटींचा फटका
11
शेतकऱ्यांना पीक कर्ज आता कमी मिळणार, ‘नाबार्ड’चे कडक निकष :  जेवढा हिस्सा तेवढाच लाभ 
12
परभणीतील घटनेच्या मागे कोण? सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचा सवाल; शांततेचे आवाहन
13
बुमराह अव्वल स्थानी कायम, कसोटी क्रमवारी; फलंदाजांमध्ये ब्रूकचा दबदबा
14
एबडेनला नवा साथीदार हवा होता : रोहन बोपन्ना
15
"हेडमास्तर प्रमाणे प्रवचन देतात अन्..."; मल्लिकार्जुन खर्गे यांचा जगदीप धनखड यांच्यावर निशाणा
16
घरातून ओढून नेलं अन् गळा... माओवाद्यांकडून भाजप नेत्याची हत्या! पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप
17
थकवा, मूड स्विंग्स... नाइट शिफ्टचा शरीरावर वाईट परिणाम; डॉक्टरांनी दिल्या ३ बेस्ट डाएट टिप्स
18
ST Bus: एसटीचा एक रुपयात १० लाखांचा विमा; जखमी प्रवाशाला किती मिळते मदत? जाणून घ्या...
19
Video: रिल बनवण्याचा नाद भोवला! चालत्या ट्रेनमधून बाहेर लटकलेली तरूणी खाली पडली अन्...
20
'चेस मास्टर' रहाणे! मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी भाऊच्या भात्यातून आला 'फिफ्टी प्लस'चा 'चौकार'

कागदांचा मोठा मुखवटा बनवायची सोपी  ट्रिक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2020 6:10 PM

कागदाच्या पट्ट्य़ांचा फेसमास्क

ठळक मुद्दे हा मुखवटा घालून तुम्ही इतरांना घाबरवू शकता.

तुमच्या घरात चार पाच दिवसांची वर्तमानपत्रंची रद्दी आणि वाटीभर कणिक असेल तर तुम्ही एक भारी गोष्ट करू शकता. अर्थात, कणिक नुसती घरात असून काही उपयोग नाही, आईने ती तुम्हाला दिली सुद्धा पाहिजे.  पण जर का तुम्ही एक किंवा निदान अर्धी वाटी कणिक मिळवण्यासाठी आईला पटवलंत, तर तुम्ही काहीतरी भारी करू शकता.सगळ्यात आधी त्या अर्धी वाटी कणकेत भरपूर पाणी घालून ती चांगली ढवळून घ्या. त्यातल्या गुठळ्या हाताने मोडा. मग ते मिश्रण गॅसवर ठेऊन मंद आचेवर ढवळत रहा. कणिक चांगली शिजली की त्याची खळ तयार होईल. तुमच्यापैकी काही जण पतंग चिकटवायला घरी खळ करत असतील किंवा काही जणांच्या आईवडिलांना खळ बनवता येत असेल. त्यांच्याकडून तुम्हाला डायरेक्ट खळ बनवून मिळाली तर उत्तम, फक्त ती कशी केली ते नीट बघून शिकून घ्या.

आता वर्तमानपत्रच्या वीतभर लांबीच्या आणि दोन बोटं रुंदीच्या पट्ट्या कापा किंवा फाडा. आता साधारण आपल्या चेहे?्याच्या मापाची कढई घ्या. ती जमिनीवर पालथी घाला. आता त्याच्यावर एक वर्तमानपत्र सपाट करून घाला. त्या वर्तमानपत्रवर कापलेल्या पट्ट्या खळीने चिकटवा. सगळी कढई भरली की जरा थांबा. खळ वाळली की त्यावर पट्ट्यांचा अजून एक थर द्या. तो थर वाळला की अजून एक थर. असं करत करत सुमारे अर्धा सेंटीमीटर जाडीचा थर तयार झाला की ते सगळे थर कडक वाळू द्या. मग तो अर्धगोल सुलटा करा. आतली कढई घासून आईला परत द्या. (म्हणजे ती पुढच्या वेळी आपल्याला परत मिळू शकते.)हा तुमच्या मुखवट्याचा बेस आहे. आता यावर तुमच्या चेहे?्याचा अंदाजाने नाक, तोंड, डोळे पेन्सिलने काढा आणि कटरने कापा. आणि मग उरलेला मुखवटा तुम्हाला पाहिजे तसा रंगवून घ्या. हा मुखवटा घालून तुम्ही इतरांना घाबरवू शकता. किंवा असे जास्त मुखवटे बनवून रंगीत रंगवून भिंतीवर शोपीस म्हणून टांगू शकता.