शहरं
Join us  
Trending Stories
1
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
2
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
3
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
4
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
5
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
6
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
7
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
8
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
9
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
10
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
11
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
12
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम
13
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
14
IND vs BAN T20 : ऋतुराज गायकवाडला पुन्हा डच्चू! चाहत्यांचा रोष; चांगली कामगिरी असूनही वगळलं
15
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
16
"CSK च्या चाहत्यांसाठी दुःखाची बाब आहे पण...", गंभीरची जागा घेताच ड्वेन ब्राव्हो भावुक
17
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
18
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
19
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
20
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता

कमरेवर हात ठेऊन गुडघा खाली जमिनीला टेकवायचा, बघा जमतं का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2020 7:50 AM

वॉकिंग लंजेस - पाय बळकट होण्यासाठी उत्तम व्यायाम

ठळक मुद्देहा अवघड आहे, की सोपा, तेही मला सांगा.

सांगा, कोणाकोणाला   व्यायामप्रकार येतात, किंवा कोणीकोणी करून पाहिलेत? मला माहीत आहे, कोणालाच सगळे व्यायाम एकदम भारी येत नसतील किंवा  सगळे व्यायाम करूनही पाहिले नसतील. काही हरकत नाही.मी सांगतेय, त्यातले सगळेच व्यायामप्रकार आपल्याला आलेच पाहिजेत, किंवा रोज ते करायलाच पाहिजेत असंही काही नाही. उलट रोज थोडे वेगवेगळे व्यायाम करून पाहिले तर जास्त मजा येते, असाच अनुभव तुम्ही सर्वानी घेतला असेल. शिवाय आणखी एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, एकच व्यायामप्रकार, पण तो थोडासा बदलूनही करता येतो. म्हणजे त्याची डिफिकल्टी लेवल वाढवता येते. पण लक्षात ठेवा, तुम्हाला ते माहीत असेल, किंवा कोणी शिकवले असतील, तरच असे अवघड व्यायामप्रकार करून बघा. नाहीतर ते नाही केले तरी चालतील.मागे मी तुम्हाला लंजेस कसे करायचे, हे शिकवलं होतं. म्हणजे बादशहासारखं कमरेवर हात ठेऊन गुडघा खाली जमिनीला टेकवायचा. आठवलं?ठीक आहे. त्यातलाच थोडा वेगळा प्रकार मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्याचं नाव आहे ‘वॉकिंग लंजेस’!कसा कराल हा व्यायाम?

 

1- पायात थोडं, म्हणजे खांद्याइतकं अंतर ठेवा. दोन्ही हात कंबरेवर ठेवा.2- पाठ ताठ. बिलकूल वाकवू नका.3- आता उजवा पाय पुढे टाका. पण मांडी जमिनीला समांतर पाहिजे. त्याचवेळी डाव्या पायाचा गुडघा जमिनीला अलगद टेकला पाहिजे. 4- अशा पद्धतीनं आपल्याला चालत जायचं आहे. पाय आलटून पालटून.5- प्रत्येक पायाचे दहा रिपिटेशन्स करा. हा व्यायाम आणखी अवघड करायचा असेल, तर दोन्ही हातात छोटेसे डंबेल्स घेऊनही तुम्हाला चालता येईल. पण इतक्यात ते करायची गरज नाही. यामुळे काय होईल?1- पायात ताकद येईल.2- मांडय़ा ताकदवान होतील.3- रक्ताभिसरण चांगलं होईल.4- स्टॅमिना वाढेल.असं बरंच काही. बघा करून.आणि मागे जो व्यायाम आपण केला होता, त्यापेक्षा हा अवघड आहे, की सोपा, तेही मला सांगा.