शहरं
Join us  
Trending Stories
1
रविंद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? निकाल राखीव ठेवला
2
प्रवाशांनी उड्या मारल्या, आरोपी बॅग घेऊन पळाला अन्... कुर्ला बस अपघाताचा CCTV समोर
3
कुर्ल्यात बसने चिरडलेल्या महिलेच्या हातातून काढल्या सोन्याच्या बांगड्या; पोलिसांकडून शोध सुरु
4
शिंदे गटाला गृह अन् महसूल खाते मिळणार नाही?; अमित शाह-फडणवीसांमध्ये दिल्लीत बैठक
5
Stock Market News: निफ्टीच्या विकली एक्सपायरीवर बाजार सुस्त; सेन्सेक्स-निफ्टी फ्लॅट, मेटल-IT स्टॉक्स मजबूत
6
आणखी भव्यदिव्य होणार शाहरुखचा 'मन्नत' बंगला, कोट्यवधींचा खर्च करुन करणार मोठा बदल
7
तुमची पत्नी ५ स्मार्ट पद्धतीनं वाचवू शकते तुमचा Income Tax! कमाईही करू शकते डबल; म्हणाल 'वाह क्या बात है!'
8
"दोन नात्यात राहणं सोपं नव्हतं, पण..", रीना रॉय आणि पत्नीला एकत्र डेट करत होते शत्रुघ्न सिन्हा, दिली कबुली
9
अंबादास दानवेंचे विरोधीपक्षनेते पद धोक्यात; संख्याबळ समान झाल्याने काँग्रेसला हवे झाले...
10
कुणी महिन्याला ५० हजार कमावतं तर कुणी १ लाख...; 'या' गावातील लोकांचं आयुष्यच बदललं
11
बोअरवेलमध्ये अडकलेल्या ५ वर्षीय आर्यनचा मृत्यू; ५६ तासांनी बाहेर काढल्यानंतर थांबला होता श्वास
12
'आई कुठे काय करते'च्या कलाकारांनी केलं कौमुदीचं केळवण, अभिनेत्री लवकरच बांधणार लग्नगाठ
13
संपादकीय: धनखड यांच्यावरील विरोधकांचा अविश्वास की इष्टापत्ती?
14
महायुतीचा फॉर्म्युला; सहा आमदारांमागे एक मंत्रिपद; विस्तारासाठी फडणवीस, अजित पवार दिल्लीत
15
आजचे राशीभविष्य - १२ डिसेंबर २०२४: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
16
केजरीवाल धास्तावले?- छावणीत चिंतेचे सावट!
17
परभणी बंदला हिंसक वळण; जमावबंदी लागू; तणाव कायम
18
सातपुड्यात दवांचा बर्फ; तापमान आले ६ अंशांवर; काश्मीरसारख्या थंडीचा अनुभव
19
जामिनासाठी न्यायाधीशाने मागितले पाच लाख; चौघांवर गुन्हा दाखल
20
गुलाब घेऊन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांचे स्वागत; राहुल गांधींनी राजनाथ सिंह यांना दिला तिरंगा

‘व्हर्चुअल वर्ग’ चालवण्यासाठी करून पाहाता येतील असे प्रयोग.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 4:21 PM

शाळा बंद ही संधी मानून आम्ही केलेला नवा प्रयोग

ठळक मुद्देकरके सिखो

नीलिमा कुलकर्णी , आनंद निकेतन, नाशिक.     16 मार्च 2020 रोजी शाळा बंद झाली. उरलेले 15 दिवस परीक्षा होईल या आशेने ठरवलेला अभ्यासक्रम व्हॉटसऐपवर व्हिडिओज किंवा सरावाच्या वर्कशीट्स पाठवून पूर्ण केला. मुलांनीही उत्सुकतेने नवीन माध्यमांचा आधार घेत अभ्यास केला. या काळात अभ्यास करताना काय वाटले, हे जाणून घेण्यासाठी एक प्रश्नावली मुलांकडून भरून घेतली, त्यातून आम्हालाही बरेच शिकायला मिळाले.    ऑनलाईन शिक्षणाचा साधकबाधक विचार करता जास्तीत जास्त ऑफलाईन  शिक्षण कसं चालू राहील याचा विचार आम्ही करत होतो.स्वयं प्रेरणोने मुलं शिक्षक नसतानाही काय काय शिकू शकतात याचा विचार करत असताना   ‘कर के सीखो’ या प्रकल्पाची नवीन कल्पना आकार घेऊ लागली.    कोविड काळातली अपरिहार्यता स्वीकारून त्याकडे एक संधी म्हणून पहायचे आम्ही ठरवले.मुले स्वत:हून काय शिकतात,त्यांची प्रेरणा कशात आहे, त्यांच्या आवडीच्या विषयात झोकून देऊन काम करू शकतात का ,गरज पडल्यास कुणाची मदत घ्यायची ते ठरवू शकतात का हे शोधण्याची हीच योग्य वेळ होती. नाहीतरी शाळेत प्रत्येकाच्या आवडीनुसार,क्षमतेनुसार ,गतीनुसार शिकवणो शक्य होते का? विषयांची चौकट व काही बंधने असतातच!    या प्रकल्पात मुलांनी आपल्या आवडीचे विषय निवडून,ठरवलेला साचेबद्ध अभ्यासक्रम नसताना स्वत:च शिकणो अभिप्रेत होते.नमुन्यादाखल काही विषय येथे देत आहे. उदा. निसर्गातील एखाद्या सजीवाच्या हालचालीचा अभ्यास, एखादे तत्व वापरून वैज्ञानिक खेळणी बनवणो, घराचे बजेट समजून घेणो, कमी करणो,नवीन भाषा शिकणो इ.

मुलांना गरज पडेल तिथे मदत देण्याची एक योजना आखून संपूर्ण जून महिना मुलांनी प्रकल्प करायचा असे मांडले गेले. प्रत्येकाला वैयक्तिकरित्या मार्गदर्शन मिळावे , विषय ठरवायला, पुढे न्यायला मदत मिळावी म्हणून मित्रत्वाच्या नात्याने मदत करायला  ‘सांगाती’ नेमून दिले.शाळेतले शिक्षक, पालक,माजी विद्यार्थी आणि हितचिंतक असे सगळे सांगाती म्हणून ठरले. प्रत्येकाकडे 3/4 मुले होती. त्यांच्याशी फोन किंवा व्हिडिओकॉल मार्फत गप्पा , आवश्यक तिथे पालक व सांगातींची मदत असे स्वरूप ठरले. त्यासाठी आधी मुलांना संभाव्य विषयांची यादी, सांगाती, सूचना , पालकांसाठी सूचना हे सर्व पाठवण्यात आले. प्रकल्प समजावून सांगण्यासाठी झूम मीटिंग,व्हिडिओ, पीपीटी ही माध्यमे वापरली.     वेळ -जागा, साहित्य, क्षमता यांचा अंदाज घेत मुलांनी आपापल्या आवडीच्या विषयाचा अभ्यास सुरु केला आहे.त्यासाठी माहिती मिळवणो,अनेकांशी बोलणो, कौशल्य मिळवणो,अडचणी सोडवणो व उद्दिष्टांपयर्ंत पोहोचण्याचा प्रय} करणो या दिशेने त्यांचा प्रवास सुरु आहे. अर्थात यात अंतिम परिणाम महत्वाचा नसून प्रक्रिया महत्वाची आहे हे पालक व मुलांच्या मनावर बिंबवण्यात आले आहे!