ऑनलाइन शिकवणं हे नेहमीच्या शिकवण्यापेक्षा वेगळं आहे हे तर उघड आहे.अनेक शिक्षकांना हा नवा अनुभव हवासा वाटत असेल, काहींना नोकरी टिकवायची तर जुलमाचा रामराम वाटत असेल. वाटो काहीही, ऑनलाइन शिकवणं जर पुढयात असेल तर त्याचा विचारही नव्या रीतीनं करायला हवा. ऑनलाइन शिकवणं म्हणजे काही रॉकेट सायन्स नाही, सरावानं, आपलं आपण शोधत नव्या पध्दती त्यातही सापडतील.मात्र तोवर हाताशी असाव्यात म्हणून या काही अगदी सोप्या, हाताशी असाव्यात अशा टिप्स.करुन पहा. सहज जमेल. तंत्र माणसाशी मैत्री करायला तयार असतंच, माणसांनी तंत्रशी जमवून घ्यायला पाहिजे.1. रेकॉर्ड करा.ऑनलाइच शिकवा म्हणजे लाइव्ह, पण ते करताना ही शक्यताही गृहित धरायला हवीच की कुणा मुलाला तेव्हा कळलं नसेल, कदाचित नेटच नेमकं गेलं असेल, त्याला बरं नसेल, घरातलं वातावरण साजेसं नसेल, तर त्याला ते लेक्चर पुन्हा ऐकता, पाहता आलं पाहिजे. त्यामुळे लाइव्ह जातानाच आपलं लेक्चर रेकॉर्डिगला लावा. रेकॉर्ड करा, मुलांना पाठवा. याचे दोन फायदे! मुलांना ते लेक्चर पुन्हा पाहता येऊ शकेल, आणि दुसरा फायदा म्हणजे तुम्हालाही ते पुन्हा रिव्हाइज करुन आपल्या काय चुका झाल्या हे पाहून, त्या पुन्हा टाळता येतील.
2. चेहरा दाखवा.अनेकजण आता पीपीटी करत आहेत, तास चालू असताना ऑनलाइन व्हीडीओ दाखवत आहेत. मात्र नुसतं ते प्रेङोण्टिंग मोडवर शिकवणं नको, तुमचा चेहरा दाखवा. तुमच्या चेह:याकडे पाहून, तुमच्या विदद्यार्थी जास्त कनेक्ट करू शकतील.
3. मेक इट शॉर्टतुम्ही जर व्हिडीओ करुन ते मुलांना दाखवणार असाल तर ते छोटे ठेवा, 10 किंवा 15 मिनिटांपेक्षा जास्त नको. एकतर मुलांचा अटेंशन स्पैन. दुसरं म्हणजे फाईलची साइज मोठी होते, अपलोड, डाऊनलोडला प्रॉब्लम येतो. त्यामुळे दोन-तीन-चार छोटे व्हिडीओ करा. मोठे नकोच.
4. फॉण्ट चेकतुम्ही ज्या स्लाइड मुलांना दाखवाल त्या एकदा स्मार्टफोनवर बघा. त्यांचा फॉण्ट वाचता येतोय का पहा. बरीच मुलं मोबाइलवर शिकतात, टॅब किंवा लॅपटॉप सगळ्यांकडेच नसतो. म्हणून मग मोबाइलवर तो फॉण्ट दिसला पाहिजे.
5. सगळं स्वत:च? कशाला?आपणच सगळे व्हिडीओ करू, जास्त सोपं करू, जास्त टेकसॅव्ही होऊ असा लोड घेऊ नका. इंटरनेटवर अनेक व्हिडीओ उपलब्ध आहेत, स्लाइड्स, फोटो आहेत, त्या वापरा. कमी वेळात जास्त करण्यापेक्षा, थोडंच वेगळं करा. अजून बरंच काही, उद्याच्या अंकात