कम्प्युटर, फोन यामुळे आपण आता पत्रं लिहायचं विसरूनच गेलो की काय असं वाटायला लागतं. पण इमर्सन वेबर ही आपली एक मैत्रिण मात्र रोज पत्रं लिहिते. त्या पत्रसाठीचं पाकिटही ती स्वत: तयार करते. त्यावर चित्रं काढते. आणि आपल्या मित्र मैत्रिणींना पोस्टानं पाठवते. ही इमर्सन फक्त 11 वर्षाची असून ती अमेरिकेतील साऊथ डकोटा येथे राहाते. सध्या या कोरोनाच्या काळात मानसिक ताकद वाढावी असे विचार ती आपल्या पत्रतून लिहिते. इमर्सनला पत्रं लिहायला खूप आवडतं. कारण आपलं पत्र वाचताना समोरचा खास आपल्यासाठी वेळ काढतो. विचार करून आपल्या हातानं आपल्याला उत्तर लिहून पाठवतो. ही गोष्ट इमर्सनला खूप आवडते. रोज आपल्या मित्र मैत्रिणींना पत्र लिहिणा:या इमर्सननं एकदा ही पत्रं पोहोचवण्या:या पोस्टमन दादांनाच पत्र लिहिलं. तिनं पत्रत लिहिलं की, ‘ तुम्ही माङयासाठी खूप महत्त्वाचे आहात. कारण तुम्ही मी लिहिलेली पत्रं माङया मित्र मैत्रिणींना पोहोचवता, त्यांऩी लिहिलेली पत्रं मला आणून देता. माङयाकडे फोन नाही. पण केवळ तुमच्यामुळेच मी माङया मित्र मैत्रिणींना पत्रद्वारे भेटू शकते आहे. माङया मित्र मैत्रिणीना माझीे पत्रं वाचून आनंद होतो. पण त्यांना हा आनंद मिळवून देण्यात तुमचाही वाटा मोठा आहे. त्यामुळे हे पत्र आज मी तुम्हाला लिहित आहे. ’
त्या पोस्टमन दादानं इमर्सनचं हे पत्रं वाचलं . त्याला खूप आनंद झाला. त्यानं पोस्ट ऑफिसातल्या आपल्या मुख्य सरांना इमर्सनचं हे पत्र दाखवलं. सरांनी पोस्टातल्या सर्व लोकांना ते वाचून दाखवलं. प्रत्येकालाच इमर्सनच्या या पत्रचं खूप खूप कौतुक वाटलं. मग प्रत्येकानं एक पत्र इमर्सनला लिहिलं. कोणी पत्रतून विचार लिहिले, कोणी कविता लिह्ल्याम कोणी चित्रं काढले तर कोणी पत्रतून इमर्सनला जोकही लिहून पाठवले. हीे सर्व पत्रं घेऊन पोस्टमनदादा इमर्सनकडे आले. आपल्या एका पत्रला आलेली एवढी उत्तरं बघून इमर्सनलाही खूप आनंद झाला इमर्सनच्या या कृतीची दखल तिकडच्या वृत्तपत्रंनीही घेतली. तिच्या या पत्रलेखनाची बातमी छापून आली.