ठळक मुद्देअसं का होतं?
साहित्य :कागद, पाते, साबणाची पूड, पाणी, टब.कृती :1. एका टबमध्ये पाणी भरा. 2. एक कागद घ्या. पात्याचा वापर करून कावळ्याच्या पायाच्या आकारासारखा आकार कापा. 3. ही झाली आपली होडी. (ती इंग्रजीतल्या उलट्या वाय अक्षरासारखी दिसेल). ती हलकेच टबमध्ये सोडा. 4. होडीच्या आकाराच्या मध्यभागी दोन बोटे असल्यासारख्या भागातल्या पाण्यात एक चिमूट साबणाची पूड टाका. 5. ती पाण्यात विरघळेल तशी ही होडी पुढे पुढे सरकेल.
असं का होतं?साबणामुळे पाण्याचा पृष्ठभाग ताणला जातो आणि होडी पुढे ढकलली जाते