उन्हाळा आणि पावसाळ्याची सुरुवात या काळात अनेक फळं मिळतात. पेरू, चिकू, आंबे, द्राक्ष, जांभळं, कवठं,तुती, करवंदं आणि याव्यतिरिक्त तुमच्या तुमच्या भागात जी काही फळं मिळत असतील ती वेगळी. ही सगळी फळं आपण या दिवसात खातो, पण ती काही वर्षभर मिळत नाहीत. आणि मग आपल्याला उरलेलं पूर्ण वर्ष आपल्या आवडत्या फळाची आठवण येत राहते. पण ही फळं तुम्ही वर्षभरासाठी टिकवून ठेऊ शकता असा विचार तुम्ही कधी केलाय का?म्हणजे असं बघा, अनेक घरातून दर वर्षी आई / आजी मुरांबा किंवा साखरांबा करून ठेवतात. आणि मग वर्षभर आपण केव्हाही कैरी / आंब्याची चव चाखू शकतो. असाच मुरांबा किंवा जॅम किंवा जेली अनेक फळांची करता येते. त्यातल्या कुठल्या फळांचा जॅम तुम्ही खाल्ला आहे?
आता बाजारात वेगवेगळ्या फळांचा जॅम विकत मिळतो. पण त्यात बरीच प्रिझव्र्हेटिव्ह्ज घातलेली असतात. शिवाय मोठ्या कंपनीने तो बनवून, पॅक करून, लेबल लावून, बराच प्रवास करून तो तुमच्या शहरापयर्ंत पाठवलेला असतो. त्यात विकणा?्या दुकानाचा नफाही असतो. त्यामुळे तो जॅम आपल्याला बराच महाग विकत मिळतो. शिवाय ब?्याच फळांचा जॅम कोणी करतही नाही.पण साखर हे एकच प्रिझव्र्हेटिव्ह वापरून तुम्ही ब?्याच फळांचा जॅम घरीच करू शकता. जरा आईला / आजीला लोणी लावा. त्यांना कदाचित साखरेचं प्रमाण माहिती असेल. जर नसेल तर आजूबाजूला कोणाला माहिती आहे का ते विचारा. आणि नाहीच, तर आपले आपण प्रयोग करून बघा.फळांचा रस काढायचा, त्यात साखर घालायची आणि ते मिश्रण उकळायचं. ते पुरेसं घट्ट झालं की तुमचा जॅम तयार!यात एक आहे, कुठल्याही फळाला त्याचा जितका रस असेल तेवढीच साखर किमान घालावी लागते. त्यापेक्षा कमी साखर घातली तर पाक टिकत नाही. म्हणजे एक वाटी रसाला एक वाटी साखर. साखरेचं प्रमाण काही कवठासारख्या फळांच्या बाबतीत वाढूही शकतं. प्रयोग करून बघा. आजवर कोणी न केलेला जॅम कदाचित तुम्हाला सापडून जाईल.
.