आज आपण एक गेम खेळूया. तुमचे आईबाबा, भावंडं, आजीआजोबा सगळ्यांना या गेममध्ये सामील करून घ्या. म्हणजे सगळ्यांचाच वेळ मस्त जाईल. साहित्य: मिरच्या, तमालपत्र, पनीर, कोथिंबीर, वास असलेला कुठलाही तांदूळ, वरण, प्रत्येक पदार्थ ठेवायला एक वाटी. कृती: 1) सगळे पदार्थ वाट्यांमध्ये ठेवा. 2) नियमित स्वयंपाक बनवणारे घरातले सदस्य या खेळात जज म्हणून ठेवा.3) आता जो खेळाडू पहिल्यांदा खेळणार असेल त्याचे डोळे बांधा. त्याच्यासमोर सगळ्या पदार्थांच्या वाट्या ठेवा. आधी वाट्या दाखवायच्या नाहीत. 4) मग प्रत्येक वाटीतल्या पदार्थाचा वास घेऊन तो पदार्थ नेमका कोणता आहे हे त्या खेळाडूने ओळखायचं. पदार्थाला हात लावायचा नाही फक्त वासाने ओळखायचं. 5) खेळाडूने किती पदार्थ ओळखले हे त्याच्या नावासमोर जजना लिहायला सांगा. 6) घरातल्या सगळ्यांनी हा खेळ खेळायचा. ज्याने कुणी सगळ्यात जास्त पदार्थ ओळखले असतील तो जिंकला.
7) वासावरून चटाचट पदार्थ ओळखता येऊ शकतात त्यांना त्यामुळे जज बनवायचं म्हणजे बाकीच्यांना जिंकण्याची संधी मिळू शकते.