घरातल्या शिवणाच्या किटमधली विविध बटणं, तुटलेली; पण जपून ठेवलेली बटणं, जुन्या टाकून द्यायच्या कपडय़ांची बटणं, डिंक, जाड पांढरा कागद, रंग, ब्रश.कृती :1. एका पांढ -या कागदावर संपूर्ण कागद मावेल एवढा झाडाचा आकार काढून घ्या.2. या झाडाला फांद्याही काढा फक्त पाने नकोत.3. झाडांच्या फांद्यांना चॉकलेटी रंगाने रंगवून घ्या. रंग वाळू द्या.
4. आता तुमच्याकडे असलेली विविध आकाराची बटणं पानांच्या ऐवजी कागदावर ठेवून अरेंज करा.
5. तुमच्या मनाप्रमाणो बटणं ठेवून झाली की एक एक बटण आहे त्याच जागी डिंकाने चिकटवा.
6. त्यानंतर तुम्हाला हवं असेल तर त्या बटणांच्या आजूबाजूने अजून पानं, फुलं, पक्षी काढा आणि रंगवा.
7. मस्त बटणांचे झाड तयार.
8. याची तुम्ही फ्रेम करू शकता. किंवा नुसतंच दोरा बांधून खोलीत लटकवू शकता.