- रणजितसिंह डिसले प्राथमिक शिक्षक, परीतेवाडी शाळा
ऑनलाईन शाळेची गंमत अशी कि इथ तुम्ही जेंव्हा वेळ असेल तेंव्हा शिकू शकता. आपले आई बाबा त्यांना आवडेल त्या शाळेत आपल्याला दाखल करतात. काही जणांना अशी शाळा आवडते तर काहीना नाही आवडत. ज्यांना आवडत नाही ते आपल्या आई बाबांकडे ती शाळा बदलण्यासाठी आग्रह धरतात. अशी लगेच शाळा बदलणं काहीसं कठीण असतं. पण ऑनलाईन शाळेत मात्र तुम्ही कधीही जावू शकता आणि नाही आवडली तर नावडती शाळा बदलून दुस?्या शाळेत जावू शकता, तेही एका क्लिक वर. समजा एखादा विषय चांगल्या पद्धतीने शिकवणारे शिक्षक दुस?्या शाळेत असतील तरीही तुम्ही त्यांच्या वर्गात उपस्थित राहून त्यांच्याकडून तो विषय समजून घेवू शकता.
आता दिल्ली सारख्या मोठ्या शहरातील अनेक खाजगी शाळांनी त्यांचे ऑनलाईन वर्ग सुरु केले आहेत. पण ते वर्ग त्याच्या शाळेतील मुलांपुरते मर्यादित आहेत. पण ऑनलाईन जगतात असं काहीजणांसाठी मर्यादित ठेवता येणं फार काळ शक्य नाहीये. इंटरनेटमुळे माहिती, ज्ञान व संधी सर्वांसाठी खुली झाली आहे. ऑनलाईन शाळेलाही हा नियम लागू होतो. काही ऑनलाईन शाळा या फी आकारतात तर काही मोफत चालतात. इंटरनेटच्या या दुनियेत ऑनलाईन शाळा या शिक्षक केंद्री झाल्या आहेत. त्यामुळे अनेक शिक्षकांनी त्यांचे ऑनलाईन वर्ग सुरु केले आहेत. येत्या जून पासून तुमच्या शाळेतील शिक्षक देखील असे ऑनलाईन वर्ग सुरु करण्याची शक्यता आहे. मग अशी ऑनलाईन शाळा तुम्हांला आवडेल ना?