ठळक मुद्देहा प्रयोग मोठी माणसं आजुबाजूला असतानाच करायचा आहे.
साहित्य:क्रेयॉन्स, ताटली, काड्यापेटी.कृती :1. क्रेयॉन्स म्हणजेच तेली खडू किंवा मेणाचे खडू. ते बनवताना मेण वितळवून त्यात रंग घालतात, त्यांना खडूचा आकार देतात आणि भोवताली कागद गुंडाळतात. 2. आपल्याला उजेड पाडण्यासाठी त्याचा उपयोग करता येईल. 3. काड्यापेटी पेटवून तेली खडूचे टोक तापवा. त्यातले थोडे मेण वितळून ताटलीत पडू द्या. 4. त्यात तेली खडू बसवून पेटला की काही मिनिटे आपल्याला उजेड मिळेल.
असं का होतं?मेण अर्धवट जळल्यामुळे त्यातून कर्ब बाहेर पडतो, त्याचे तापमान जास्त असले की त्यातून प्रकाश बाहेर पडतो.पण एक लक्षात ठेवाहा प्रयोग मोठी माणसं आजुबाजूला असतानाच करायचा आहे.