- राजीव तांबे
साहित्य :2 फुगे. हे फुगे फुगवताना एक फुगा मोठा आणि एक फुगा छोटा असे फुगवा.तर करा सुरू :
1. एका हातात छोटा फुगा आणि दुसर्या हातात मोठा फुगा घ्या.2. आता दोन्ही हातातील फुगे एकाचवेळी वरती उडवायचे.3. फुगे वर उडविल्यानंतर तुम्ही कुठल्याही दिशेने दोन पावलं चालायचंच आहे.4. दोन पावलं चालल्यानंतर 3 टाळ्या वाजवायच्या आहेत.5. तीन टाळ्या वाजवल्या नंतरच फुग्यांचा कॅच पकडायचा आहे.6. लक्षात ठेवा, आधी फुगे वर उडविणो, मग चालणो, नंतर टाळ्या वाजवणो आणि मगच कॅच पकडणो हा क्रम चुकता कामा नये.7. हा क्रम चुकला किंवा फुगा जमिनीवर पडला तर खेळाडू आऊट.8. एकाचवेळी दोन फुगे ऊंच उडवून अंतराचा अंदाज घेत चालणो आणि पटकन 3 टाळ्या वाजवून कॅच पकडणो या चार क्रियांचा समन्वय साधणो हे या खेळातले मोठे आव्हान आहे.9. दोन पावलं चालल्यानंतर फुगे पकडता येतील अशा बेताने ते उडविणो हे याखेळातलं कौशल्य आहे.