- मराठी विज्ञान परिषद
तुमचे तुमच्या एका डोळ्यावर जास्त प्रेम आहे. असे म्हंटले तर तुम्ही आम्हाला वेड्यात काढाल.आमचा स्क्रू ढिला झाला आहे का अशी शंका तुम्हाला येईल. पण आम्हाला खात्री आहे. तुमचे तुमच्या एका डोळ्यावर जास्ती प्रेम आहे. त्याचेच तुम्ही ऐकता, दुस?्याचे अज्जिबात ऐकत नाही. चला सिद्ध करू या !हे कसं सिध्द करणार?1. घरा बाहेर बघा. 2.मूठ बंद करून उजवा हात लांब करा. 3.मुठीतले पहिले बोट मुठीबाहेर काढा. 4. दूरवर दिसणारे झाड किंवा कोणतीही स्थिर वस्तू त्या बोटाने दाखवा. बोट हालवू नका. 5. एकदा उजवा डोळा बंद करा एकदा डावा डोळा बंद करा. 6. कोणता डोळा बंद केला की बोट हललले दिसते? 7 - तो तुमचा लाडका डोळा. त्याचे तुम्ही मानता मानत नाही.
किती जणांचा उजवा डोळा लाडका आहे? किती जणांचा डावा डोळा लाडका आहे? माणसामध्येच एक डोळा लाडका असण्याचा फायदा कोणता आहे? तोटा कोणता आह?करून पाहा बरं विचार!