तुमच्या घरी निरनिरळ्या आकारांचे पास्ता असतील. न्युडल्स असतील, त्यांनाच आज वापरून मस्त काहीतरी गम्मत करूया. हे सगळं वापरताना खूप घेऊ नका. थोडेच पास्ता घ्या. साहित्य: घरात असलेले सर्व आकाराचे पास्ता, न्युडल्स, रंग, ब्रश, डिंक
कृती : 1) वेगवेगळे रंग लावून प्रत्येक पास्त्या छान रंगवून घ्या. 2) रंग शक्यतो लाल, पिवळा, हिरवा, निळा, काळा, गुलाबी, जांभळा असे रंग वापरा. 3) न्यूडल्सचे छोटे तुकडे करून तेही व्यवस्थित रंगवून घ्या. 4) आता सगळं छान वाळू देत.5) आता या वाळलेल्या रंगीत पास्ता आणि न्युडल्सपासून तुम्हाला हवे ते आकार बनवा. 6) पास्ता आणि न्युडल्स एकमेकांना चिकटवून तुम्ही हे आकार बनवू शकता.
आपल्याकडे मिळणारे निरनिराळे पास्ता 1) स्पगेटी: सरळ रेषेसारखा लांब2) फुसिल्लीनी : स्पायरल आकार 3) फार्फाल : फुलपाखराचा आकार 4) पेने : उभे पोकळ 5) मॅकरोनी : इंग्रजी सी आकाराचे पोकळ