मला माहीत आहे, आई-बाबांनी कितीही सांगितलं, तरी उडय़ा मारायचं तुम्ही थांबवलं नसेल.उडय़ा मारायला सगळ्यांनाच आवडतं, हेही मला माहीत आहे. त्यामुळे मागे तुम्हाला उडय़ा मारण्याचा एक व्यायाम शिकवला होता.घरात नुसत्या उडय़ा मारण्याबरोबरच उडय़ा मारण्याचा तो व्यायाम तुम्ही करतच असाल.करताय ना?काय म्हणता? फार आवडला तुम्हाला तो व्यायाम?चला, मग आज मी तुम्हाला आणखी एक हटके व्यायाम शिकवणार आहे.
हा व्यायामही उडय़ा मारायचाच आहे आणि पहिल्यापेक्षा भारी. म्हणजे या उडय़ा मारायला तुम्हाला जास्त मजा येईल. वेगवेगळ्या पद्धतीनं उडय़ा मारायची एक यादीच मग तुमच्याकडे तयार होईल.आजच्या उडीचं नाव आहे, ‘साइड हॉप्स’. मराठीत याला म्हणायचं ‘टणाटण उडय़ा’!शिकायचा हा व्यायाम?कशा माराल उडय़ा?1- अगदोर सरळ ताठ उभे राहा.2- दोन्ही पाय जुळलेले. अगदी एकमेकांना चिकटलेले नसले तरी चालेल, पण शेजारी शेजारी हवेत. त्यात फार अंतर नको. 3- हात कंबरेवर ठेवा. क्यात आणखी एक गंमत आहे. हातांची वेगवेगळ्या पद्धतीनं हालचालही तुम्ही करू शकता. म्हणजे डावीकडे उडी मारली की उजवा हात वर घ्यायचा आणि उजवीकडे उडी मारली की डावा हात वर घ्यायचा.) आधी हात कंबरेवरच राहू द्या. नंतर तुम्हाला एक-एक प्रकार करून पाहता येईल. 4- आता हात कंबरेवरच ठेऊन तुम्हाला एकदा डावीकडे आणि एकदा उजवीकडे उडी मारायची आहे. 5- पण कुठेही नाही मारायची उडी. दोन्ही बाजूच्या उडय़ा समान अंतरावर पडल्या पाहिजेत. त्यासाठी डोळ्यांनीच अंतर ठरवून घ्या किंवा त्यासाठी जमिनीवर तुम्हाला एखादी खूणही करता येईल.6- दोन्ही बाजूला दहा-दहा उडय़ा मारा. असे तीन सेट करा.7- पण लक्षात ठेवा, उडी फार जोरात मारायची नाही. आपले पाय जमिनीवर अलगद पडले पाहिजेत. काय फायदा या उडय़ांचा?1- पायाचा सर्वागीण व्यायाम यामुळे होईल.2- तुमच्या पोट:या मस्त तयार होतील.3- मांडय़ांच्या मागच्या भागात ताकद येईल. 4- मांडय़ांच्या साइडचा भाग दणकट होईल.माराल मग या उडय़ा?- तुमचीच ‘टणाटण’ मैत्रीण ऊर्जा