तुम्ही एखादी गोष्ट ठरवून सलग किती दिवस करू शकता? दोन दिवस? आठ दिवस? महिनाभर? एक वषर्ं?खरं खरं सांगायचं. म्हणजे एखादं काम तुम्हाला जर का मनापासून पटलं तर तुम्ही किती काळ ते रेग्युलरली करू शकता? आता यात दात घासणो वगैरे मोजू नका प्लीज. नाहीतर म्हणाल की ते आम्हाला पटलंय तर आम्ही कित्ती वषर्ं रोज करतोय. असं नाही. खरं काम. कारण तुमच्या आईवडिलांना जर विचारलं, तर ते म्हणतील की, ’तो / ती नाङ्घ काही सांगू नका त्याचं. दोन दिवससुद्धा दम टिकणार नाही. दहा वेळा आठवण केल्याशिवाय एक कामसुद्धा धड करत नाही!’- इत्यादी इत्यादी..मग आता आईवडिलांना दाखवून द्यायचं का, की ज्या गोष्टी तुम्हाला महत्वाच्या वाटतात त्या तुम्ही रोज करू शकता?- काम सोपं आहे. अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही आजवर अनेक वेळा त्याबद्दल ऐकलं पण असेल. यापूर्वी ब?्याचदा ते केलं पण असेल. पण यावेळी त्यात महत्वाचं आहे ते ‘रोज करणं’. अगदी परत शाळा सुरु होईपयर्ंत!
आणि काम काय? तर पक्ष्यांसाठी गॅलरीत किंवा गच्चीत पाणी आणि खायला दाणो ठेवायचे. आधीच उन्हाळा, त्यात एरवी सगळीकडे असणारी माणसांची वर्दळ नाही म्हंटल्यावर प्राणी आणि पक्ष्यांचे दुप्पट हाल होणार आहेत. तुम्ही जर रोज त्यांच्यासाठी खाणं आणि पाणी ठेवलंत तर काही दिवसांनी त्यांना त्याची सवय होईल. मग ते अजून पक्ष्यांना घेऊन येतील. फक्त एक काम करायचं. पाणी ठेवतांना पसरट टब मध्ये ठेवायचं आणि त्यात मध्ये एखादा दगड किंवा विटेचा तुकडा ठेवायचा. पक्ष्यांना पाणी प्यायला लागतं, तसं आंघोळीला पण लागतं.तुम्ही जर ग्राऊंड फ्लोअरला राहत असाल, तर प्राण्यांसाठीही एखादी बादली भरून पाणी ठेवा. एवढेच दोन महिने त्यांच्याहीसाठी अवघड असतात.तुम्हाला हे काम महत्वाचं वाटेल यात शंका नाही. ते तुम्ही सहज करू शकाल यातही शंका नाही. प्रश्न इतकाच आहे की रोज कराल का?