आपल्याला फ्रिजवर काय काय लावायला आवडतं. स्वत:चे फोटो, आपण केलेलं आर्ट अँड क्राफ्ट, शाळेतल्या काही गमतीजमती. मग फ्रिजला हे सगळं चिकटवायचं तर खूप सारी मॅग्नेटस हवीत. दरवेळी बाजारातून मॅग्नेटस कशाला आणायची. त्यापेक्षा आपण घरीच बनवूया की.
साहित्य: पांढरे ट्रान्सपरंट मार्बल पेबल्स (म्हणजे मराठेत गोट्या), कागद, रंग, डिंक आणि छोटी गोल चुंबक अर्थात मॅग्नेटस
कृती: 1) कागदावर अंगठ्याचे ठसे घ्या.
2) या ठशांना नाक डोळे, हात पाय, तुम्हाला जे जे काही काढायचे आहे ते काढा.
3) आता मार्बल्स किंवा पेबल्सना मागच्या बाजूने डिंक लावा.
4) आणि हे पेबल बरोबर अंगठाच्या ठश्यावर अलगद ठेवा. जास्त दाबू नका.
5) पेबल्स कागदाला निट चिकटल्यावर कागद पेबल्सच्या आकारात कापून घ्या.
6) आता कागदाला मागच्या बाजूने पुन्हा डिंक लावून छोटे गोल मॅग्नेट चिकटवा.
7) झालं तुमचं फ्रिज मॅग्नेट तयार. अशा पद्धतीने तुम्ही हवी तेवढी छोटी मॅग्नेटस बनवून वापरू शकता.
8) ठश्यांची थीम तयार करून शकता. आई, बाबा आणि घरातल्या इतर लोकांच्या अंगठ्याच्या ठश्यांचीही मॅग्नेटस बनवू शकता.