- राजीव तांबे
साहित्य : एक रबरीचेंडू.चेंडू असा टाकायचाआहे की तो पुढे गेल्यावर परत आपल्याकडे आला पाहिजे.
तर करा सुरू :1. उजव्या हाताचाअंगठाआणि तर्जनी यांमध्ये चेंडू धरा.2. बोटांच्या मधल्या भागाचा आधार देऊन चेंडू स्थिर ठेवा.3. हाताचा धक्का देऊन चेंडू पुढ ेढकलताना अंगठा आणि तर्जनी विरूध्द दिशेन ेफिरवून चेंडूला स्वत:भोवती फिरण्यासाठी उलट दिशेने गती द्या. 4. हाताच्या ढकलण्याने चेंडू पुढे जाईल आणि परत मागे तुमच्याकडे येईल.
असं का झालं :चेंडूची एक गती हाताच्या धक्क्याने पुढे जाणो आहे. त्याचवेळी चेंडूला विरुध्द दिशेन ेचक्राकार गतीही दिलेली आहे.चेंडू पुढे जाताना सरकत जातो, फिरत जात नाही.
त्या गतीचा प्रभाव शून्यावर आला की विरुध्द दिशेची चक्राकार गती चेंडूला परत मागेआणते.