साहित्य :1 ताजे लिंबू. 10 सें.मी. लांब तांब्याची स्वच्छ तार. 10 सें.मी. लांब स्टीलचीतार. 1 पॉलीश पेपर. 1 (शक्य असल्यास) वीजमापक (गॅल्ह्वनॉमीटर)
तर करा सुरू :स्टीलची तार घासून पुसून स्वच्छ करुन घ्या. या तारेचे एक टोक लिंबामध्ये टोचा. ते साल भेदून लिंबाच्या मध्यापयर्ंत पोहोचले पाहिजे.आता तांब्याची तार घ्या. काहीवेळा तांब्याच्या तारेवर इनॅमलचे कोटींग असते. अशावेळी ही तार पॉलीश पेपरने घासून पुसून स्वच्छं करावी. (तारेवर जरइनॅमल कोटींग असेल तर आपला प्रयोग यशस्वी होणार नाही) स्टीलच्या तारेपासून 2 सें.मी. अंतरावर ही तांब्याची स्वच्छ तार पण तशीचटोचा. लिंबातून बाहेर आलेली दोन्ही तारांची टोके जवळ आणा आणि हलकेच तुमच्या जिभेवर ठेवा.
चुरचुरल्यासारखा अतिसौम्य चुरचुरीत विजेचा झटका जिभेवर जाणवेल. या दोन्ही तारांची टोके वीजमापकाच्या दोन टोकांना जोडा. वीजमापकाचा काटा हलेल आणि तुम्ही तयार केलेली वीज मोजता येईल.
असं का झालं ?
सर्व वस्तू अणूंनी बनलेल्या आहेत. प्रत्येक अणूत इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन्स असतात. जेव्हा पदार्थातील इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह निर्माण होतो तेव्हा त्या पदाथार्तून विजेचे वहन होते. लिंबामधे असलेले आम्ल आणि तारांचे धातू यांमधे रासायनिक क्रिया होऊन इलेक्ट्रॉन स्वतंत्र होतात. दोन्ही तारा जिभेवर टेकल्या किंवा वीजमापकाला जोडल्या की विद्युतमंडल (सर्किट) पूर्ण होते आणि सौम्य विजेचा झटका म्हणजेच जिभेवर चुरचुर जाणवते.