ठळक मुद्देहळदीचा रंग आम्लारी पदाथार्मुळे लाल होतो तर आम्लामुळे पिवळा.
- मराठी विज्ञान परिषद
साहित्य :हळद पूड, पाणी, खायचा चुना, लिंबाची फोड.कृती :1. हळदीची चिमूटभर पूड हातावर ठेवा. त्यावर थोडे पाणी घाला. 2. हातावर हात चोळून हळदीची पिवळा रंग हातभर पसरू द्या. 3. कणीभर खायच्या चुना हळद लावलेल्या हातावर ठेवा.4. पुन्हा हातावर हात ठेवून चोळा. हात कुंकवासारखे लाल होतील. 5. आता त्यावर दोन थेंब लिंबू रस टाका. 6. पुन्हा हातावर हात ठेवून चोळा. हात पुन्हा पिवळे होतील.
हे असं का होतं?1. हळदीचा रंग आम्लारी पदाथार्मुळे लाल होतो तर आम्लामुळे पिवळा.