शहरं
Join us  
Trending Stories
1
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
2
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
3
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
4
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
5
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
6
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
7
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
8
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
9
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
10
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
11
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
12
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम
13
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
14
IND vs BAN T20 : ऋतुराज गायकवाडला पुन्हा डच्चू! चाहत्यांचा रोष; चांगली कामगिरी असूनही वगळलं
15
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
16
"CSK च्या चाहत्यांसाठी दुःखाची बाब आहे पण...", गंभीरची जागा घेताच ड्वेन ब्राव्हो भावुक
17
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
18
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
19
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
20
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता

किडे करायचे का घरात ? एकदम  भन्नाट..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2020 7:50 AM

ते बनवण्यासाठी हवेत आइस्क्रीमचे चमचे, कागद आणि रंग!

ठळक मुद्देदुपारी सगळे झोपल्यावर करायचे धमाल उद्योग

एरवी किडे बघितले की तुमची घाबरगुंडी उडते का? नाही? भारीच. तुम्ही खूप धीट आहात. आता आपण घराच्या घरी किडे बनवू आणि आपल्या घरातल्या झाडांना खुश करूया. कसं ? चला बघूया. साहित्य: रंगीत कागद, कात्री, पांढरा आणि काळा  कागद आणि फूड पार्सल्सबरोबर येणारे किंवा आईस्क्रीमचे छोटे लाकडी चमचे,डिंक कृती: 1) रंगीत कागदाचे पंख कापून घ्या. कापताना ते चमच्याला चिकटवायचे आहेत या अंदाजाचे कापा. चमच्यापेक्षा खूप मोठे नकोत आणि खूप लहान नकोत. 2) पांढ?्या आणि काळ्या कागदाचे काही छोटे गोल आणि काही मोठे गोल कापायचे आहेत. जे आपण डोळे म्हणून वापरणार आहोत. काही किड्यांना छोटे डोळे द्या, काहींना चमच्याच्या डोक्यापेक्षा मोठे डोळे द्या. 3) आता एक चमचा घ्या. त्यांच्या दांडीला दोन्ही बाजूने एक एक पंख चिकटवा. आणि चमच्याचा खड्डा किड्याचं डोकं आहे असं समजा. 4) या भागाला आपल्याला डोळे चिकटवायचे आहेत. 5) पांढ?्या गोलात काळी बुबुळं काढा. काढताना तुम्हाला हवा तो लूक डोळ्यांना द्या. म्हणजे कधी बुबुळं गोलाच्या मधे, कधी एका बाजूला तर कधी दोन्ही डोळ्यांची बुबुळं दोन वेगळ्या दिशांना. तुम्ही हवं त्या पद्धतीने हे रंगवू शकता. 6) आता जे काळे गोल आहेत त्यात आपल्याला पांढरी बुबुळं काढायची आहेत. 7) त्यासाठी जर तुमच्याकडे व्हाईट मार्कर असेल तर तो वापरा. किंवा पांढरा वॉटर कलर, तेल खडू असं काहीही वापरू शकता. 8) किंवा काळ्या गोलापेक्षा थोड्या छोट्या आकाराचा पांढरा गोल कापून त्यात काळं  बुबुळं काढून मग तो छोटा पांढरा गोल मोठ्या काळ्या गोलातही चिकटवून तुम्ही डोळे बनवू शकता. 

9) हे डोळे तुमच्या किड्यांवर चिकटवा. 10) आणि तुमचे हे सुंदर रंगीबेरंगी किडे घरातल्या झाडांवर, पडद्यांवर, किंवा कुठेही जिथे तुम्हाला वाटेल तिथे अलगद ठेवा किंवा लटकवा. 11) चिकटवायचे असतील तर मात्र आईबाबांची परवानगी घ्यायची. त्यांनी हो म्हटलं तरच चिकटवायचे.