सांगा मला, काल मी सांगितलेला व्यायाम कोणी कोणी केला आणि कोणाकोणाला आपल्या पाठीला बोट लावता आलं? तुमच्यापैकी एकही जण असा नसेल, ज्याला दोन्ही हातांनी सारख्याच सहजतेनं हा व्यायाम करता आला!बरोबर ना?- त्याचं कारणही तसंच आहे. आता तुमच्यापैकीच बघा, काही जणांचं गणित चांगलं असेल, काहींचं इंग्रजी तर काहींना अभ्यासाचं नको, फक्त खेळायला सांगा. त्यात ते एकदम पक्के असतात. आपल्या हातांचं; नुसत्या हातांचं कशाला, आपल्या प्रत्येक अवयवाचं असंच असतं. त्यांचा जितका उपयोग तुम्ही कराल, तेवढी त्यांची क्षमता वाढत जाते. त्यामुळे आपल्या प्रत्येक अवयवाला व्यायाम पाहिजे.
आज थोडा अवघड व्यायाम तुम्हाला शिकवते. दाखवाच करून! ज्यांना, ज्यांना अगदी पहिल्याच वेळेस आणि तेही एकदम सहजतेनं हा व्यायाम जमेल, त्या त्या प्रत्येकाला मी दोन-दोन चॉकलेट्स देईन! काय करायचं?1. सरळ उभे राहा. आपले दोन्ही पाय हळूहळू फाकवत चला. हां बरोब्बर. सर्कसमध्ये दाखवतात तस्सं किंवा जिम्नॅस्टिकची मुलं करतात तसं!2. लक्षात ठेवा, पाय जेवढे तुम्हाला फाकवता येतील, तेवढेच फाकवा. मांडय़ांत, जांघेत कळ आली की लगेच थांबा. नाहीतर पाय, मांडय़ा इतक्या दुखतील, की दुस:या दिवशी तुम्हाला झोपूनच राहावं लागेल!3. या व्यायामाची घाई कधीच करायची नाही. रोज करत गेलात, तर हळूहळू तुमची लवचिकता नक्कीच वाढेल. इतकी, की तुम्ही दोन्ही पाय पूर्णपणो फाकवून त्यावर आरामात बसू शकाल आणि पुढे हात टेकून एखादी डुलकीही काढू शकाल. सोबतच्या चित्रत मी करतेय ना तस्सं! है, कोई तय्यार?है किसी में हिंमत?- तो फिर कर के दिखाव!और ले जाव मेरे से चॉकलेट!तुमचीच ‘फेकू’ मैत्रीण,- ऊर्जाऊर्जा