- राजीव तांबे
साहित्य :01 छोटी बादली. 01 मीटर जाड दोरी. 05 लिटर पाणी.50 कागदाचे बोळे.
तर करा सुरू :1. कागदाचे बोळे बादलीत ठेवा.2. प्रथम हातात बादलीची कडी पकडून, हात ताठ ठेवून बादलीला जोरात आडवेझोके द्या. बादलीला चांगला वेग आला की ती उभ्या वतुर्ळाकार दिशेने गरागराफिरवा. वरच्या बिंदूपाशी बादली पूर्ण उलटी झालेली असेल.3. यावेळी गोल फिरण्याचा वेग जास्ती असेल तर एकही बोळा खाली पडणारनाही.4. बादली किती वेगात फिरवली असता बोळे पडत नाहीत याचा अंदाज आतातुम्हाला आला असेल.5. आता बादलीच्या कडीला मध्यभागी दोरी घट्ट बांधा. हातात दोरी घट्ट धरुनबादली गरागरा फिरवा. दोरी बांधलेली असल्याने बादली वेगात फिरवणो सोपे होते.6. आता बादलीमधे अर्धे पाणी भरा. आणि वेगात फिरवा गरागरा. एक थेंब हीपाणी सांडणार नाही.
असं का झालं :
बादली जेव्हा वर्तुळाच्या वरील बिंदूपाशी उलटी असते तेव्हा गुरुत्वाकर्षणपृथ्वीच्या दिशेने आणि केंद्रगामी बल (सेंट्रिफ्युगल फोर्स) विरुध्द दिशेने त्यावरकार्य करतात. एका विशीष्ठ वेगात बादली फिरत असताना केंद्रगामी बलगुरुत्वाकर्षणाइतके होते आणि वस्तू स्थिर राहते. त्याहून जास्त वेग वाढला तरवस्तू पडत नाही.