पण घरात आहोत, बाहेर जाऊन काहीही विकत आणता येऊ शकत नाही त्यामुळे ज्या काही गमतीजमती करायच्या त्या घरात असलेल्या वस्तूंनीच. तर, आज तुमच्या, आईच्या, आजीच्या, बहिणीच्या जुन्या त्यांना न होणा?्या किंवा त्यांना नको असलेल्या बांगड्यांपासून बनवू या पेन स्टॅन्ड. साहित्य: सर्व आकाराच्या टाकाऊ, जुन्या, नको असलेल्या प्लस्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या, रंग, डिंक
कृती: 1) सगळ्या बांगड्या एकत्र करा. 2) त्यातल्या डिझायनर बांगड्या वेगळ्या करा. 3) प्लेन बांगड्या वेगळ्या करा. 4) आता प्लेन बांगड्या जर तुम्हाला रंगवायच्या असतील तर रंगवून घ्या. 5) सगळ्या रंगवलेल्या बांगड्या वाळू द्या. 6) आता डिझाईन बनवू या. 7) डिझाइनर बांगड्या, प्लेन बांगड्या आणि तुम्ही रंगवलेल्या बांगड्या, तुम्हाला पाहिजे त्या क्रमाने एकवार एक ठेवा. 8) एकदा का तुमचं डिझाईन तयार झालं की प्रत्येक बांगडी एकमेकांना चिकटवून घ्या. झाला तुमचा पेन स्टॅन्ड 9) हा पेनस्टॅण्ड शक्यतो काचेच्या बांगड्यांचा करू नका. कारण चुकूनही तो पडला तर फुटेल.