तुम्ही आईबाबांचं व्हॉट्स अप नक्की वापरत असणार. काही जणांकडे स्वत:चंही असेल. त्यात कितीतरी इमोजीकॉन्स असतात. मित्रमैत्रिणींना मेसेजेस करताना तुम्ही ते वापरताच. काही काही वेळा तर काही न लिहिता फक्त या इमोजीमधूनच तुम्ही मित्रमैत्रिणींना तुमचा मेसेज देता. आणि त्यांनाही तो कळतो. बरोबर ना?मग इमोजी फक्त मोबाईलमध्ये असले पाहिजेत असं कुठेय? तुम्ही इमोजीज बनवू शकता की आणि घरातही आईबाबा, आजीआबा, तुमची भावंडं यांनी कधीतरी गंमत म्हणून तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही बनवलेल्या कागदी इमोजीवरून सांगा. कसं ? कागदाचा गोल इमोजी तुमच्या चेह?्यासमोर धरून!आता कसा बनवायचा ते बघू.
साहित्य : पुठ्ठा, पांढरा कागद, पिवळा, लाल रंग, ब्रश, काळ स्केच पेन कृती : 1) पुठ्ठे गोल आकारात कापून घ्या. 2) अगदी छोटे गोल कापू नका. आणि अगदी मोठेही नकोत. साधारण तुमच्या चेह?्यासमोर धरता येतील या आकाराचे. 3) आता या पुठ्ठ्यांवर पांढरे गोल चिकटवा. 4) तुमच्या आईबाबांपैकी कुणाचातरी फोन घ्या. 5) त्यातले तुम्हाला आवडतील ते इमोजी या गोलांवर काढा आणि रंगवा. 6) आणि मग तुम्हाला जे काही वाटतंय त्याचा इमोजी तोंडासमोर धरून आईबाबांना दाखवा. 7) त्यांनाही गम्मत वाटेल, आणि घरातलं वातावरण मस्त हलकं फुलकं राहील.