शहरं
Join us  
Trending Stories
1
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
2
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
3
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
4
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
5
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
6
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
7
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
8
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
9
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
10
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
11
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
12
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम
13
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
14
IND vs BAN T20 : ऋतुराज गायकवाडला पुन्हा डच्चू! चाहत्यांचा रोष; चांगली कामगिरी असूनही वगळलं
15
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
16
"CSK च्या चाहत्यांसाठी दुःखाची बाब आहे पण...", गंभीरची जागा घेताच ड्वेन ब्राव्हो भावुक
17
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
18
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
19
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
20
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता

फ्रेंडशिप ब्रेसलेट "असे " बनवा , एकदम सॉप्पे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2020 2:42 PM

.. पण त्यासाठी तुम्हाला लोकरीच्या वेण्या घालाव्या लागतील

ठळक मुद्देदुपारी सगळे झोपल्यावर करायचे धमाल उद्योग

कित्ती बोअर होतंय ना, शाळा चालू असायला हवी होती असं वाटतंय ना, मित्रमैत्रिणी भेटत नाहीत, धम्माल दंगा करता येत नाही, नुसतं घरात बसून राहायचं. नाही म्हणायला तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींशी ऑनलाईन बोलतच असाल की. आता त्यांच्यासाठी बनवा मस्त फ्रेंडशिप बँड्स. 

साहित्य: लोकर किंवा जाड दोरा किंवा कुठल्याही रंगीत कापडाच्या अर्धा सेंटीमीटर जाडीच्या लांब पट्ट्या. कृती:1) आई, आजी वेणी कशी घालते तुम्हाला माहित आहे? नाही? मग लगेच आई किंवा आजीकडून शिकून घ्या. 2) कारण आपल्याला फ्रेंडशिप बँड बनवताना लोकरीच्या/ दो?्याच्या/ कापडाच्या वेण्या घालायच्या आहेत. 3) तुम्ही लोकर/ दोरा/ कापड यापैकी जे काही घेतलं असेल ते एकाच रंगाचं घेऊ नका. आपल्याला वेगवेगळे रंग हवेत. 4) आता तुम्ही गोळा केलेल्या कुठल्याही तीन रंगांची आई/आजीने शिकवली आहे तशी वेणी घाला. साधारण तुमच्या मनगटाच माप घ्या. तेवढा गोल होईल तोवर वेणी घाला आणि खाली गाठ मारा. 5) अशा वेगवेगळ्या रंगांच्या तीन वेण्या तयार करा. 6) आता एका वेणीच्या एका साईडला डिंक लावा आणि त्या बाजूला दुसरी वेणी चिकटवा. दुसरीच्या साईडला डिंक लावून तिसरी चिकटवा. 7) तिन्ही वेण्या नीट वाळू देत. आता त्यांचा गोल करा आणि शेवटाशी गाठ मारा. 8) गाठीच्या खाली छोटं शेपूट येईल. ते दिसायला तुम्हाला आवडत असेल तर तसंच राहूद्या, नसेल आवडत तर कापून टाका. 9) झालं तुमचं ब्रेसलेट तयार. 

10) लॉक डाऊन संपल्यावर जेव्हा केव्हा तुम्ही तुमच्या दोस्त लोकांना भेटाल त्यांना हे गिफ्ट नक्की द्या, तुमची आठवण म्हणून!