लॉक डाऊनमुळे प्राणीपक्षी जाम खुश आहेत अशा बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. पण अनेक ठिकाणी त्यांना पुरेसं खायला आणि प्यायला मिळत नाहीये.आपण घरच्याघरी त्यांच्यासाठी सोय करू शकतो. एका वाटीत पाणी ठेऊन त्यांची तहान भागवू शकतो. तसंच एका वाटीत धान्यही ठेऊ शकतो किंवा त्यांच्यासाठीही काहीतरी मस्त गोष्ट बनवू शकतो. कशी वाचा.
साहित्य: सर्व प्रकारची धान्य, गुळाचा पाक, दोरा किंवा सुतळी.
कृती: 1. आईकडून गुळाचा थोडा पाक बनवून घ्या. 2. त्यात घरात असलेली सगळी धान्य थोडी थोडी मिक्स करून टाका. आणि चांगलं ढवळा. 3. पाक कमी आणि धान्य अधिक हवीत. 4. धान्य एकमेकांना चिकटतील इतपतच पाक हवा.5. पाक आणि धान्य कोमट झालं की एक दोरी किवा सुतळी भोवती धान्यांच्या मिश्रणाचा लंब गोलाकार लाडू वळा. 6. हे करताना हाताला चटका बसू नये म्हणून प्लास्टिक वापरा. किंवा मोठ्यांच्या मदतीने करा7. लाडू थंड झाले की तुमच्या घराबाहेर लटकवा.8. भुकेले पक्षी येतील टोचे मारून धान्य खातील, पाणी पिऊन खुश होतील.
- आहे की नाही सोपी युक्ती पक्षांना खुश करण्याची? कुणी सांगावं एखाद्याशी तुमची मैत्रीही होऊन जाईल.