उन्हाळ्यातही ओठ फुटतात. खूप ऊन असेल तर ओठांना कोरडेपणा येतो. अशावेळी लहान असो की मोठे सगळ्यांना लिपबाम लावावा लागतो. बाजारात लीप बाम मिळतातच पण घरीही आपण बनवू शकतो. एकदम सोपी रेसिपी आहे.साहित्य: बी व्हॅक्स, मध, दालचिनीची वस्त्रगाळ पावडरकृती: आता आपल्या आजूबाजूची काही काही दुकानं उघडू लागली आहेत. त्यामुळे बी व्हॅक्स तुम्हाला मिळू शकेल. समजा तुमच्या भागातली उघडली नसतील तर जेव्हा केव्हा उघडतील तेव्हा हे करा. तोवर तुमच्याजवळ ही आयडिया सेव्ह करूम ठेवा.बी व्हॅक्स एका बाऊलमध्ये घ्या. हा बाउल मायक्रोव्हेवमध्ये वापरता येईल असा हवा.व्हॅक्स पातळ होईल इतपत मायक्रोव्हेव करा. आधी 30 सेकंद करा. अंदाज घ्या. चमच्याने हलवून बघा. घट्ट वाटलं तर अजून 30 सेकंद करा.आता त्यात थोडा मध आणि दालचिनीची पावडर मिसळा आणि चांगलं ढवळा. सगळं एकजीव झालं पाहिजे.एकतर हे मिश्रण तुम्ही मोल्डस मध्ये घालू शकता किंवा छोट्या प्लास्टिक डबीत ओतून थंड करा.सध्या उन्हाळा खूप जास्त आहे त्यामुळे थोडावेळ फ्रिजमध्ये ठेवलं तरी चालेल. झाला तुमचा लिपबाम तयार.
तुमच्याकडे जर मायक्रोव्हेव नसेल तर वी व्हॅक्स तुम्ही डबल बॉयलर मध्ये वितळवू शकता. ते कसं करायचं ते आई सांगेल.दालचिनी ची पावडर करताना दालचिनीचे तुकडे मिक्सर मधून वाटा. कोरडीच पूड करा. आणि मग एका फडक्यात ती गळून घ्या. म्हणजे अगदी मऊ पूड मिळेल जी ओठांवर टोचणार नाही.