- राजीव तांबे
आईबाबा काहीतरी काम करत असतात, त्याच्या मनाप्रमाणो काही लिहिलं गेलं नाही कि त्या कागदाचा बोळा करून ते कच?्यात टाकतात बरोबर! आता आपण असेच बोळे बनवून त्यापासून मस्त डिझाइन्स तयार करूया. साहित्य,: कागद, ओले रंग, कात्री, ब्रश कृती: 1) एका ए-फोर साईज कागदाचे चार भाग करून घ्या. 2) त्याचा चक्क बोळा करा. 3) मग हा बोळा सगळीकडून तुम्हाला आवडेल त्या रंगाने रंगवून घ्या. 4) मग उलगडा. आणि परत त्याचा बोळा करा. 5) यावेळी रंगाने रंगवा.
6) हळूच परत हा बोळा उघडा. उलट करा. परत बोळा करा. हे करताना कागद फाटणार नाही याची काळजी घ्या. 7) असं अनेकदा करा. प्रत्येकवेळी बोळा केल्यानंतर वेगळ्या रंगाने रंगवा. 8) तुम्हाला हवे तेवढे रंग लावून झाले कि थांबा. 9) हा बोळा शेवटी एकदा उघडा पण सरळ करू नका. तसाच कोरडा होऊ देत. 10) बोळा केलेला कागद पूर्ण कोरडा झाला की नीट सरळ करा. हा कागद तुम्ही निरनिरळ्या गोष्टींसाठी वापरू शकता. अगदी आईबाबांना, जवळच्या मित्रमैत्रिणींना यावर पत्र लिहू शकता किंवा छानसं ग्रीटिंग करू शकता.