- राजीव तांबे
साहित्य :3 काचेचे ग्लास. 1 काचेचा ऊंच मोठा ग्लास. लाल, निळा, व पिवळा असे तीन जलरंग. 3 चमचे. (टी स्पून). 1 मोठा चमचा (टेबल स्पून). एक वाटी मीठ. एक ग्लास गरम पाणी. दोन ग्लास थंड पाणी.
तर करा सुरू :1. पहिल्या दोन ग्लासात थंड पाणी ओता.2. तिसर्या ग्लासात गरम पाणी ओता.3. पहिल्या थंड पाण्याच्या ग्लासात दोन चमचे मीठ घालून ढवळा.4. मग तीसर्या गरम पाण्याच्या ग्लासात दोन चमचे मीठ घालून ढवळा.5. आता पहिल्या ग्लासात निळा रंग, दुसर्याम ग्लासात पिवळा रंग, तिसर्याल ग्लासात लाल रंग घालून ढवळा.6. काचेचा ऊंच मोठा ग्लास घ्या. त्याच्यात अंदाजे एक इंचापयर्ंत निळे पाणी सावकाश ओता.7. आता मोठ्या चमच्यात पिवळे पाणी घेऊन ते ऊंच ग्लासाच्या कडेवरून सावकाश आत सोडा. हे पाणी आत सोडत असताना निळे पाणी हलता कामा नये. पिवळ्या पाण्यचा थर एक इंचाचा झाला की थांबा.8. आता याच पध्दतीने पिवळ्या पाण्यावर लाल पाणी सोडा.9. आता ग्लासात रंगीत पाण्याचा डोंगर तयार झाला आहे!!
असं का होतं :मीठ घातल्यावर पाण्याची घनता वाढते. पाण्याचे तापमान वाढले की पाण्याची घनता कमी होते. दोन वेगवेगळ्या घनतेचे पदार्थ जर ग्लासात सावकाश ओतलेतर जास्त घनतेचा द्रव तळाशी जातो आणि कमी घनतेच्या द्रवाचा थर वरती राहातो.