तुमच्याकडे स्वत:चा मोबाईल आहे का? असेल तरीही तो सतत बघायचा नाही. नो स्क्रीन डे/ अवर करायचं आणि ब्रेक्स घ्यायचे. नाहीतर सुट्टी आहे म्हणून दिवसभर आपला फोन चालू असं नको. आणि समजा तुमच्याकडे स्वत:चा फोन नसेल तरीही सारखा आईबाबांकडे फोनसाठी हट्ट करायचा नाही. उलट यावेळी त्यांच्या फोनच्या कव्हर्सना डिझायनर लूक देण्याची जबाबदारी घ्या. साहित्य: फोन कव्हर, पोस्टल रंग, हेअर ड्रायर कृती: 1) फोन कव्हर एका रद्दीच्या कागदावर ठेवा आणि कव्हरच्या मागच्या बाजूला जिथे कॅमेराची चौकट असते त्यावर सेलोटेप लावा. तिथे रंग जाऊ द्यायचा नाहीये. 2) त्यानंतर कव्हरवर पांढऱ्या रंगाचे मोठे तीन थेंब टाका. 3) त्यावर तुमच्या आवडायच्या कुठल्याही दोनररंगांना ओता. 4) आता हेअर ड्रायर ऑन करून या रंगांवर मारा.
5) हेअर ड्रायर मधून येणाऱ्या गरम वाऱ्या मुळे हे रंग एकमेकांमध्ये मिसळतील. पसरतील. अतिरिक्त रंग रद्दीच्या कागदावर सांडेल. तर सांडूद्या. 6) रंग संपूर्ण कव्हरभर पसरले, मिसळले गेले की हेअर ड्रायर बंद करून कव्हर आणि रंग वाळू द्या. 7) वाळल्यानंतर हळूच कव्हर रद्दीच्या कागदावरून उचला. रद्दीचा कागद कचऱ्या त फेकून द्या. 8) तुमच्या किंवा आईबाबांच्या मोबाईलचं मस्त डिझायनर कव्हर तयार आहे.