यावर्षी लॉक डाऊनमुळे शाळा लवकर आटोपली. पण जुनी वह्या पुस्तकं, गणवेश आणि बूट अजूनही घरात असतीलच. कारण ती आवराआवर करायला आपल्याला वेळ कुठे मिळालाय? मग थोडं डोकं लावूया आणि जुन्या बुटांपासून नवीन बूट बनवूया. म्हणजे मग जेव्हा केव्हा लॉक डाऊन संपेल आणि आपण बाहेर पडू तेव्हा सगळ्या मित्रमैत्रिणींमध्ये तुम्हाला भास मारता येईल. काय बोलता?
साहित्य: तुमचे तुम्हाला होणारे जुने कॅनव्हास बूट. (नवीन बुटांवर प्रयोग करायचा नाही. नाहीतर आईचा मार खावा लागेल. :), रंग, बॅश. रद्दीचा पेपर
कृती: 1) कॅनव्हास बूट स्वच्छ धुवून उन्हात वाळवून घ्या. सध्या मस्त ऊन पडलंय. त्यामुळे तुम्ही सकाळी जर बूट धुतलेत तर दुपारपयर्ंत ते सहज वाळतील. त्यानंतर तुम्ही ते वापरू शकता.
2) आता रद्दीचा पेपर पसरावा. त्यावर धुवून वाळवलेले बूट ठेवा.
3) तुम्हाला ते बूट कसे रंगवायचे आहेत याचा जरा विचार करा. म्हणजे त्यावर फुलं पानं, वेल बुट्टी काढायची आहे की भूमितीच्या आकृती काढायच्या आहेत, कि अजून काही.. थोडं प्लॅन करा.
4) आता बुटांना सगळ्या बाजूंनी पांढरा रंग लावा. आणि वाळू द्या.
5) रंग वळला कि तुम्हाला जे काही चित्र, आकृत्या, शब्द रंगवायचे आहेत ते पेन्सिलने बुटांवर काढा.
6) आणि मस्त रंगवा. रंग वापरताना शक्यतो ब्राईट कलर्स वापरा. म्हणजे तुमचे बूट उठावदार दिसतील.
7) रंग वळले की तयार तुमचे नवे कोरे रंगीत बूट.