- राजीव तांबे
साहित्य : वर्तमानपत्रचे चार डबल कागद एकमेकांना चिकटवून करा मोठा कागद. एक सेफ्टी पीन व एक टाचणी. चुंबक.
तर मग करा सुरू :1. दोन मुले कागदाच्या दोन कडा हातात धरून उभे राहतील.2. हातात चुंबक घेऊन एक मुलगा कागदाच्या मागे उभा राहील.3. हातात चुंबक घेतलेला मुलगा कागदाच्या मागच्या बाजूने चुंबकत्याला टेकवेल.4. त्याचवेळी दुसरा मुलगा कागदाच्या दुसर्?या बाजूने, जिथे चुंबकचिकटले आहे तिथे सेफ्टिपीन व टाचणी चिकटवेल.5. आता मागील मुलगा चुंबक कागदावरून सरकवत नेईल.6. त्याचवेळी कागदावरच्या पिन व टाचणी उड्या मारत इथे-तिथेपळू लागतील. खालीवर सरकू लागतील. पण पडणार मात्र नाहीत.
सपाट भागावर टणाटण उड्या मारत, पळणारी पिन-टाचणीचीसर्कस पाहायला मजा येईल.
असं का होतं :1. चुंबकाकडे लोखंड,कोबाल्ट व निकेल हे तीन धातू व या धातूंच्या मिश्रणानेबनलेले मिश्रधातू आकर्षित होतात.