युट्युब हा शॉर्ट फिल्म्सचा खजिना आहे. इथे तुम्हाला हव्या तेवढ्या शॉर्ट फिल्म्स बघायला मिळू शकतात. अनिमेशन केलेल्याही अनेक फिल्म्स अगदी मोफत बघायला उपलब्ध आहेत. युट्युबवर सारखी गाणी नाहीतर इतर काहीतरी फुटकळ गोष्टी बघत बसण्यापेक्षा या शॉर्ट फिल्म्स तुम्ही बघू शकता. आता शॉर्ट फिल्म्स असल्याने त्यांचा कालावधी तसा कमीच असतो. काही पाच मिनिटांच्या तर काही अध्र्या तासाच्या. अशाच काही मस्त शॉर्ट फिल्मस्ची यादी सोबत देतोय. याखेरीज शॉर्ट फिल्म्स तुम्हीही शोधू शकता. आता तुम्ही शोधलेली फिल्म बघणोबल आहे की नाही येऊ कसं कळणार? तर त्या शॉर्ट फिल्मचं नाव गुगलवर टाईप करा. म्हणजे त्या फिल्मला मिळालेलं रेटिंग, त्यावरची समीक्षा, प्रेक्षकांची मतं असं सगळं वाचायला मिळेल. काहीवेळा युट्युबवर फिल्मच्या खालच्या कमेंट बॉक्समध्येही प्रेक्षक मतं नोंदवतात ज्यावरून ती शॉर्ट फिल्म बघणोबल आहे की नाही हे ठरवता येऊ शकतं. मग शॉर्ट फिल्म्सच्या दुनियेची सैर करून या. या घ्या काही उत्तमोत्तम शॉर्टफिल्म्स :पायपरडस्टीनट्यूबलाईटद प्रेङोंट हे डिअरसॅक्रिफायङोस ऑफ या फादर
काय कार्टून पाहता सतत, शॉर्टफिल्म पहा, भन्नाट असतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 7:30 AM
शॉर्ट फिल्म्स उगाच काहीतरी फुटकळ पाहण्यापेक्षा या खजिन्याकडे जरा लक्ष असू द्या.
ठळक मुद्देआज तुम्ही काहीतरी बघणारच, तर काय बघाल?