ऑनलाईन शिका भाषा बैठे बैठे क्या करें करना है कुछ काम..- ही अंताक्षरी नंतर खेळा, तुम्हाला माहित आहे का की इंटरनेटवर तुम्ही भारतातल्या मराठी सोडून इतर भाषा शिकू शकता इतकंच नाही तर जगातल्याही अनेक भाषा तुम्हाला शिकता येऊ शकतात. इंटरनेटवर फी भरून भाषा शिकवणा?्या साईट्स आहेत तशाच मोफत विविध भाषांचे धडे देणा?्या साइट्सही आहेत. युट्युबवर अनेक चॅनल्स आहेत, ज्यावरून तुम्ही तुम्हाला हवी ती देशी किंवा परदेशी भाषा शिकू शकता. आता घरात आहात तर जापनीज, स्पॅनिश, फ्रेंच, अरबी किंवा बंगाली, मल्याळी अशी तुम्हाला हवी ती भाषा शिका. वेळही मस्त जाईल आणि एक संपूर्ण नवी भाषा तुम्हाला शिकता येईल. निरनिराळ्या लिपी कशा लिहायच्या, अक्षरांची वळणं कशी काढायची हे शिकवणा?्या साईट्स आणि युट्युब व्हिडीओजही आहेत. तेही तुम्ही बघू शकता. काही अँप्सही आहेत ज्यावरुन तुम्हाला भाषा शिकता येऊ शकते. सध्या लॉक डाऊनमुळे कुठलाही क्लास लावता येऊ शकत नाही मग घरच्या घरी तुम्हाला भाषा शिकता येतील. बरं, हे सगळं करताना सुरुवातील आईबाबांची मदत घ्यायला विसरू नका. तुम्ही बघत असलेला व्हिडीओ, साईट किड्स फ्रेंडली आहे ना हे त्यांना चेक करू देत. म्हणजे मग शिकायला तुम्ही मोकळे.
भारतीय भाषा शिकवणाऱ्या साईट्स
https://www.languageshome.com/http://www.languagereef.com/https://www.dwibhashi.org
परदेशी मोफत भाषा शिकवणाऱ्या काही साईट्स
https://www.futurelearn.comhttps://www.duolingo.com/http://www.bbc.co.uk/languages/indexhttps://www.italki.com/home