शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

ताडोबाच्या जंगलात आणि दक्षिण आफ्रिकेच्या क्रुगर पार्कमध्ये जायचंय? चला लगेच  ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 4:34 PM

मुलांना तर प्राणी बघायला किती आवडतं, म्हणूनच भारतातल्या आणि जगभरातल्या काही अभयारण्यांनी घरबसल्या जंगल सफारीचा आनंद देण्याचा प्लॅन आखला आहे.

ठळक मुद्देजंगल सफारी बघण्यासाठी यूट्यूबवर जा.

तुम्हाला माहितेय, जेव्हापासून माणसं लॉक डाऊन होऊन घरात बसली आहेत, तेव्हापासून प्राण्यांचा वावर मुक्तपणो व्हायला सुरुवात झाली आहे. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात रस्त्यांवरून मोर फिरायला लागले आहेत. तळ्यांमध्ये, नद्यांमध्ये बदकं निवांत पोहू लागली आहेत. इतकंच नाही तर जगभरात जिथे जिथे माणसाने प्राण्यांच्या जमिनीवर अतिक्रमण केलं होतं तिथे सगळीकडे आता प्राणी परतून आले आहेत. समुद्रात जहाजांची ये जा थांबल्यामुळे अनेक मासे जे एरवी खोल समुद्रात लपलेले असतात आता वर येऊन मस्त पोहोत आहेत. तुम्हाला जर याचे व्हिडीओ बघायचे असतील तर युट्युबवर खूप आहेत. तुम्ही बघू शकता. या लॉक डाऊनमध्ये सारखं किती चित्र काढणार नाहीतर विज्ञान प्रयोग करणार ना?म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन येत आहोत, व्हर्च्युअ ल जंगल सफारी. म्हणजे काय?

- तर एखाद्या जंगलाच्या सफरीत आपण जसे प्रत्यक्ष जंगलातून फिरतो त्याच पद्धतीने जंगलातून फिरायचं. पण घरी बसून. व्हच्यरुअली. सध्या देशभरातीलच काय जगभरातील जंगल सफारी बंद आहेत. पण तुम्हा मुलांना तर प्राणी बघायला किती आवडतं, म्हणूनच भारतातल्या आणि जगभरातल्या काही अभयारण्यांनी घरबसल्या जंगल सफारीचा आनंद देण्याचा प्लॅन आखला आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या क्रुगरराष्ट्रीय उद्यानाने हा प्रयोग सगळ्यात पहिल्यांदा केला. त्यांच्या जंगल सफारी भारतीय वेळेनुसार रोज सकाळी 9.30 आणि संध्याकाळी 7 वाजता असतात. यात दोन गाईड्स असतात जे दोन वेगळ्या रूट्स वरुन आपल्याला नेतात आणि तिथे दिसणारे प्राणी दाखवतात. ही सफारी तुम्ही युट्युब वरुन लाईव्ह बघू शकता. याच धर्तीवर आता आपल्या महाराष्ट्रातल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पानेही व्हचरुअल सफारी सुरु केली आहे. ताडोबातील तलाव, प्राणी, पक्षी, फुलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाघ तुम्हाला घरात बसून बघता येतील. ही सफारी दररोज दुपारी तीन वाजता 18 एप्रिल पासून सुरु करण्यात आली आहे. मग काय घरात बसा आणि बिबटे, वाघ, तरस, निरनिराळे सुंदर पक्षी, गवे बघा. शेजारच्या चौकटीत या व्हर्चुअल सफारीमध्ये जॉईन कसं व्हायचं, हे सांगीतलंय!!

**** 

ताडोबाला जायचंय?1. ताडोबाची व्हचरुअल टूर वेबसाईटवर लाईव्ह पाहाता येते :  वेबसाईट -  www.mytadoba.org2. यूट्यूबवर पाहायची असेल तर यूट्यूबवर जा, सर्च वर्ड द्या tadoba safari 3.  वेळ: दुपारी 3 वाजता 

दक्षिण आफिकेला जायचंय?1. क्रुगर राष्ट्रीय उद्यान, दक्षिण आफ्रिका यांची लाईव्ह सफारी बघण्यासाठी यूट्यूबवर जा.2. सर्च वर्ड द्या kruger national park live safariवेळ: सकाळी 9.30 आणि संध्याकाळी 7