घरात निरनिराळ्या आकाराच्या खूप किल्ल्या असतात. त्यांच्यापासून आपण आज एक गंमत शिकूया.त्यासाठी आधी आईबाबांच्या परवानगीने निरनिराळ्या आकाराच्या किल्ल्या गोळा करा. बाकी साहित्य आणि कृती अशी.
साहित्य: किल्ल्या, क्ले, रंग, ब्रश, दोरा कृती: 1. क्ले चे (म्हणजे मातीकामाच्या मातीचे) जाडसर चपटे गोळे तयार करा.2. त्या प्रत्येक गोळ्यावर एक किल्ली ठेऊन किल्लीचा नीट ठसा घ्या. 3. ठश्याच्या आजूबाजूची माती काढून टाका.4. सगळे किल्ल्यांचे ठसे घेऊन झाले की किल्ल्या स्वच्छ करून लगेच आई बाबांकडे देऊन टाका.5. ठश्याच्या वरच्या बाजूला पेन्सिलने आरपार भोक करा. त्यातून दोरा जाईल इतपत मोठं भोक ठेवा आणि ठसे वाळू द्या.6. आता प्रत्येक किल्ली ठसा तुम्हाला हव्या त्या रंगाने रंगवा. त्यावर डिझाइन ही करू शकता. 7. त्यानंतर प्रत्येक किल्लीचा वरच्या भोकातून दोरा ओवा आणि किल्ली लटकेल अस बघा.
8. सगळ्या किल्ल्या निरनिराळ्या दोऱ्याना ओवून झाल्या की जिथे घरात किल्लाळ लटकवलेलं असतं तिथे या किल्ल्या शो म्हणून लटकवा.किंवा तुमच्या खोलीत किंवा इतरत्र ही डेकोरेशन साठी तुम्ही या डिझायनर किल्ल्या वापरू शकता.