- राजीव तांबे
हा गेम दोघांत खेळायचा आहे. मुलगा आणि आई समोरासमोर बसतील. तर करा सुरू :1. प्रत्येक भाषेत असे अनेक शब्द असतात ज्यात दुसरे शब्दपण लपलेले असतात. अशा शब्दांना टूटू शब्द म्हणूया.2. समजा, मुलगा पखवाज हा टूटू शब्द सांगेल.3. आता आईने या टूटू शब्दात लपलेले खवा, खप आणि जप हे तीनही शब्द ओळखायचे आहेत.4. मग आई एक टूटू शब्द सांगेल. मुलगा त्या टूटू शब्दात लपलेले शब्द ओळखेल.
5. टूटू शब्द ऐकल्यानंतर मनातल्या मनात त्यातील अक्षरांची फिरवाफिरव करून त्यात लपलेले शब्द ओळखणो हे या खेळातलं कौशल्य आहे.6. तुमच्या संदभार्साठी मराठी भाषेतील तीन टूटू शब्द देत आहे.7. पोपट (पोप, पोट, पट). चावट (चाव, वट, चाट).सारवण (वसा, वरण, साव).- मराठीप्रमाणोच कुठल्याही भाषेत हा खेळ खेळ खेळतायेईल.