- राजीव तांबे
साहित्य :2 सेफ्टी पीन. 4 टाचण्या. 1 मीटर दोरा.सेलोटेप. कात्री. चुंबक.
तर मग करा सुरू :1. एक मीटर दोयरचे चार समान तुकडे करा.2. एका दोर्यारला एक सेफ्टी पीन बांधा. दुसर्या् दोर्याएला दुसरी सेफ्टी पीन बांधा.3. तिसर्या् आणि चवथ्या दोर्याला दोन-दोन टचण्या बांधा.4. हे दोयरचे चारही तुकडे टेबलाच्या कडेला चिकटवा.5. दोरे टेबलाच्या कडेपासून लोंबकळत राहतील.6. आता चुंबक मुठीत लपवा. आता ही मूठ टाचण्यांपासून ठराविक अंतरावरून हवेत फिरवा.7. मूठ जवळ येताच टाचण्या हवेत उड्या मारतील तर सेफ्टी पीनची थरथर होईल.8. विशीष्ट अंतराचा अंदाज आला की,एकाचवेळी सेफ्टी पीन व टाचण्या उड्या मारू लागतील.9. वेगवेगळ्या दिशेने हात फिरवून टाचण्या व सेफ्टीपीनला मस्त नाचवता येईल.10. काहीवेळा हात ऊंच ठेवून सेफ्टी पीन व टाचण्यांना अधांतरी तरंगत ठेवता येईल.11. आता आपल्या पिन डान्स क्लब मधे एखादे रॉक गाणो रॉकू द्या. या रॉकच्या तालावर, ठेक्यावर पिनांना थिरकू दे, नाचू दे. (आणि हे सर्व मोठ्या माणसांना मोठे डोळे करून बघू दे)
असं का होतं?चुंबकाकडे लोखंड,कोबाल्ट व निकेल हे तीन धातू व या धातूंच्या मिश्रणाने बनलेले मिश्रधातू आकर्षित होतात.