- मराठी विज्ञान परिषद, पुणे विभागआपल्या आसपास काही लोक डावखुरे असलेले दिसतात. ज्यांचा डाव हात काही करण्यासाठी नैसर्गिकपणो पुढे येतो अशांना डावखुरे म्हणतात. आपल्याकडे काही गोष्टी डाव्या हाताने तर काही गोष्टी उजव्या हाताने करण्याबाबत संकेत आहेत. दुसऱ्या ला काही देतांना ती गोष्ट डाव्या हाताने दिले तर ते विक्षिप्त मानले जाते. उजव्या हाताने जेवावे, उजव्या हाताने लिहावे, उजव्या हाताने प्रसाद घ्यावा या बद्दल समाजातील अनेक लोक आग्रही असतात. तसे न करणाऱ्याना प्रसंगी रागावतात, शिक्षाही करतात. डावखुरेपणा ही नैसर्गिक गोष्ट आहे. अनेक उपकरणो यंत्रेसुद्धा डावखोऱ्या ना अडचणीची ठरू शकतात. कोणकोणती ते आपन आज शोधून काढूया..
तुम्ही डावखुरे नसाल तर पुढील कृती करून बघा. 1. घरातल्या फ्रिज मध्ये एका हाताने दूधाचे भरलेले पातेले ठेवणे. 2. ज्यांचा उजवा हात डाव्या हातापेक्षा शक्तिमान असतो ते ही कृती कशी करतात? - डाव्या हातात दुधाचे भरलेले पातेले घेऊन फ्रिजपाशी जातात. उजव्या हाताने फ्रिजचे दार उघडतात आणि दुधाचे पातेले फ्रिजमध्ये ठेवून उजव्या हाताने फ्रिजचे दार बंद करतात. 3. आता हीच कृती हात बदलून करून पहा. 4. दुधाचे पातेले उजव्या हातात घ्यायचे आणि डाव्या हाताने फ्रिजचे दार उघडायचे, डाव्या हातातले दुधाचे पातेले फ्रिजमध्ये ठेवायचे आणि फ्रिजचे दार उजव्या हाताने बंद करायचे. (तुम्ही डावखुरे असाल तर हीच क्रिया डावे उजवे हात बदलून करून पहा). 5. फ्रिजसारख्याच अनेक गोष्टी डावखोऱ्याना अडचणीच्या ठरणाऱ्या असतात. उदा. काकडीचे साल काढायचे सालपे, कॉम्प्युटरचा माऊस, की बोर्ड, कापड कापायची कात्री, स्पायरल नोटबुक, हँडल असलेला मापाचा कप, इत्यादी. - अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत? शोधून काढा.