शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

रिचर्डने तयार केला सिंहांना घाबरववणारा ‘लायन लाईट’  !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 7:10 AM

सिंहांना घाबरवणारा रिचर्ड

ठळक मुद्देआज तुम्ही काहीतरी बघणारच, तर काय बघाल?

ही गोष्ट आहे रिचर्ड तुरेरेची. तो केनियातल्या नैरोबी नॅशनल पार्कच्या दक्षिणोकडे एका छोट्या गावात राहतो. गाव जंगलाच्या अगदी जवळ. वन्य प्राणी आणि स्थलांतरित ङोब्रे त्याच्या गावाच्या आजूबाजूला नेहमी फिरतात. मग त्यांच्या पाठीमागे शिकारीसाठी सिंह ही येतात. ङोब्र्यांच्या बरोबर गावातली गाईगुरंही शिकार होतात. रिचर्ड मसाई जमातीचा आहे. गुरांची शिकार कशी थांबवायची हा सगळ्याच जमातीपुढे मोठा प्रश्न होता. एकदिवस त्याचाही लाडका बैल शिकार झाला. त्यांच्या घरात तेवढा एकच बैल होता. आता काय करायचं?  सिंहांच्या दहशतीवर उपाय शोधला पाहिजे असं त्याला फार वाटायला लागलं. पण तो चिमुरडा मुलगा. करणार काय? पण त्याने हार मानली नाही. त्याला हे माहित होतं कि सिंह आगीला घाबरतात. म्हणून मशाल दाखवून त्यांना पळवून लावायचा त्याने विचार केला. पण मशालीच्या उजेडात सिंहांना गाव अधिकच स्पष्ट दिसायला लागलं आणि त्यांचा फायदाच झाला. आता काय?मग त्याने बुजगावणं लावलं. पहिल्या दिवशी सिंह पळून गेले. पण दुस?्या दिवशी धीट झाले. बुजगावणं जागचं हालत नाही म्हटल्यावर सिंहांची भीती गेली. आता?

मग एक दिवशी रात्री तो घराभोवती फिरत असताना त्याच्या हातातल्या टॉर्चला सिंह घाबरले असं त्याच्या लक्षात आलं. हलणारा उजेड सिंहांना घाबरवतो हे त्याला समजलं. टॉर्च सतत हलता आणि उघडबंद होत राहिला तर सिंह गावाकडे फिरकणार नाही असं त्याला वाटलं. काही वस्तू गोळा करून रिचर्डने  ‘लायन लाईट’ तयार केला. सिंह त्याच्या घराजवळ येणं बंद झालं. शेजारच्या आजीलाही एक बनवून दिला. हळूहळू त्याच्या संपूर्ण गावात लाईन लाईट लागले आणि सिंहांच्या त्रसापासून गाव वाचले. सिंहांचे हल्ले थांबल्यामुळे सिंहावर होणारे मानवी हल्लेही थांबले. आहे कि नाही भन्नाट गोष्ट. रिचर्डने ही गोष्ट स्वत: सांगितली आहे टेड टॉक मध्ये. तुम्हाला बघायची असेल तर गुगल वर जा आणि इंग्रजीत टाईप करा- lion light richard turere.  रिचर्डचे भरपूर व्हिडीओज तुम्हाला बघायला मिळती.