ठळक मुद्देघराला बनवा तुमची प्रयोगशाळा
- मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग
साहित्यफोन, मोबाईल, कापूस, रुमाल.कृती1. एका व्यक्तिला एका खोलीत फोन शेजारी बसवा. 2. एक मोबाईल घेऊन फोनवरून तो डायल करायला सांगा. तो आवाज लक्षात ठेवायला सांगा. 3. बसलेल्या व्यक्तीच्या एका कानात कापसाचा बोळा बसवा तसेच रुमाल बांधून तिचे डोळे झाका. 4. मोबाईलला रिंग केल्यावर जिथून आवाज येतो तिकडे बोटाने दाखवायला सांगा. 5. असे मोबाईल वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून करा. एका कानाने ऐकून नेमकी दिशा सांगायला कठीण जाते.
असे का होते?आपल्या दोन्ही कानांमध्ये ऐकू येणाऱ्या आवाजात फरक पडतो त्यामुळे आपल्याला नेमकी दिशा लक्षात येते.