खेकडे की चाल!मागे मी तुम्हाला सांगितलं होतं, निसर्गातले सर्व पशू, पक्षी, प्राणी अगदी नियमितपणो व्यायाम करतात. शिवाय त्यांना कोणी सांगतही नाही, तुम्ही व्यायाम करा म्हणून. पण आपल्याला फिट राहायचं आहे आणि निट जगायचं आहे, हा नियम त्यांना सुरुवातीपासूनच माहीत असतो. त्यामुळे ते त्यात कधीच अळम-टळम करीत नाहीत. तुम्ही नीट बघा, कोणताही प्राणी, पक्षी निराश असल्याचं आपल्याला सहसा दिसत नाही. जे लोक नियमितपणो व्यायाम करतात, त्यांच्याकडेही बघा. ही मंडळी थकलेली, निराश झालेली आपल्याला दिसत नाहीत. त्यांच्यातला उत्साह कायम ओसंडून वाहात असतो. आपल्याही प्राण्यांकडून हेच शिकायचंय. त्यामुळे मी तुम्हाला प्राण्यांचे काही व्यायाम शिकवणार आहे. हे व्यायाम आपल्याला शरीरासाठी तर खूप भारी आहेतच, पण हे व्यायाम करताना आपल्याला खूप गंमतही येईल. ज्यांना व्यायामाचा कंटाळा असेल, अशा ‘बशा’ मंडळींनाही हा व्यायाम करायला खूप मजा येईल.
आज मी तुम्हाला शिकवणार आहे, ‘क्रॅब वॉक’! याने की खेकडे की चाल!तुम्ही पाहिला आहे कधी खेकडा? कसा चालतो? कसा पळतो? पाहिला नसेल, तर नक्की पाहा. आज आपल्याला फक्त चालायचंय, पण ही आहे खेकडे की चाल!कसा कराल हा व्यायाम?1- आज खाली जमिनीवर चटई वगैरे काहीही टाकू नका. आधी पाठीवर झोपा.2- आता आपला हात आणि पाय वर उचला.3- आपलं पोटही वर घ्या. 4- आता अशा पद्धतीनं हात आणि पायांनी चाला.5- काही अंतर सरळ चाला आणि नंतर पुन्हा उलटं चाला. यामुळे काय होईल?1- तुम्ही मनगटांचा व्यायाम फारसा कधी केला नसेल. या व्यायामामुळे तुमच्या मनगटात ताकद येईल.2- तुमचे हॅमस्ट्रिंग आणि ग्लुट्स यामधली पॉवर वाढेल. 3- तुमच्या शोल्डरमधली म्हणजे खांद्यांतली लवचिकता वाढेल. अनेकांचा खांदा अचानक लचकतो. तो लचकणार नाही.4- तुमचे ट्रायसेप्स, म्हणजे दंडाच्या मागची बाजू ताकदवान होईल. 5- तुमचा बॉडी बॅलन्स सुधारेल.या व्यायामाचे आणखी बरेच फायदे आहेत, पण ते तुम्हाला करता करताच समजतील.तो समझ गये मेरी ये खेकडे की चाल?- तुमचीच खेकडय़ांची राणी, ऊजा